---Advertisement---

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, ‘हा’ दिग्गज कोलकाताविरुद्धच्या सामन्यात खेळणार

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 6:01 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 14 व्या सत्रातील सलामी सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ख्रिस लिन याने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. त्यामुळे त्याने पहिल्या सामन्यात रोहितसह सलामीला फलंदाजी केली. मागीलवर्षी मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सलामीला फलंदाजी केली होती. मात्र, डी कॉक यंदा पहिल्या सामन्यावेळी क्वारंटाईनमध्ये होता.

तो पहिल्या आयपीएल सामन्याआधी दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिले 2 सामने खेळल्यानंतर आयपीएल खेळण्यासाठी आला होता. त्यामुळे त्याला नियमानुसार क्वारंटाईन राहावे लागणार होते. पण आता त्याचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होत असून तो 13 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या सामन्यासाठी उपलब्ध होणार आहे.

अगामी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी मुंबई संघाचे संचालक झहीर खान यांनी डी कॉकने आपला क्वारंटाईन काळ पूर्ण केला असून रविवारी त्याचे सराव सत्रही पार पडल्याचे सांगितले.

त्यांनी म्हटले आहे की, “डी कॉकने आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला असून काल (रविवारी) त्याचे सराव सत्राही पार पडले आहे. त्यामुळे कोलकता विरुद्धच्या सामन्यात तो संघात उपलब्ध असणार आहे,” असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तसेच मुंबईकडून पहिला सामना खेळताना ख्रिस लिनने पुन्हा एकदा तो सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक असल्याचे दाखवून दिले होते. या सामन्यात त्याने 35 चेंडूत 49 धावा केल्या. परंतु, क्विंटन डी कॉकच्या संघात परतण्याने लिनचा संघातील पत्ता कट होऊ शकतो असे सांगितले जात आहे. त्यामुळे हे पाहाणे औस्तुक्याचे ठरेल की मुंबई इंडियन्स सलामीला कोणाला संधी देणार.

डी कॉकने गेल्या दोन हंगामात मुंबईच्या यशामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे, ज्यामध्ये त्याने 2019 आणि 2020 या सलग दोन मोसमात 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

वाथी फिवर! धवनने अश्विनला नाचण्यासाठी घातली गळ, शॉ-उमेशने घेतली मजा, पाहा भन्नाट व्हिडिओ

गावसकर धावले एमएस धोनीच्या मदतीला, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

केकेआरचा ‘हा’ शिलेदार बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा आहे जावई, एका उशीवरुन केलंत पत्नीशी भांडण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---