सध्या सर्वत्र द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत रोज काही ना काही असे घडत आहे, ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ रविवारी (१ ऑगस्ट) झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला आहे. या सामन्यात साउदर्न ब्रेव संघाचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने एक अविश्वसनीय झेल टिपला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
साउदर्न ब्रेव संघ विरुद्ध लंडन स्पिरीट यांच्यात पार पडलेल्या सामन्यात लंडन स्पिरीट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या साउदर्न ब्रेव संघाकडून ॲलेक्स डेविसने ४० चेंडुंमध्ये ५ चौकारांच्या साहाय्याने ५० धावांची खेळी केली होती. तर क्विंटन डी कॉकने २७ धावांचे योगदान दिले होते. साउदर्न ब्रेव संघाला १०० चेंडूंच्या समाप्तीनंतर ६ बाद १४५ धावा करण्यात यश आले होते.(Quinton dekock taken unbelievable catch in the hundred tournament)
क्विंटन डी कॉकचा अप्रतिम झेल
साउदर्न ब्रेव संघाने दिलेल्या १४५ धावांचा पाठलाग करताना लंडन स्पिरीट संघातील सलामीवीर फलंदाज ॲडम रॉसिंगटन आणि जोश इंग्लिस यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु जोश इंग्लिस ५५ धावांवर फलंदाजी करत असताना जॉर्डनने स्लोवर चेंडू टाकला होता. तो चेंडू फलंदाजी करत असलेल्या जोश इंग्लिसने यष्टिरक्षकाच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो प्रयत्न फसला आणि यष्टीरक्षण करत असलेल्या क्विंटन डी कॉकने चपळता दाखवत, डाव्या बाजूला डाईव्ह मारत अप्रतिम झेल टिपला.
फलंदाजाने मारलेला डी कॉकपासून खूप दूर होता. त्यामुळे कोणालाही वाटले नव्हते की, तो इतकी मोठी डाईव्ह मारत झेल पकडू शकेल. पण त्याने झेल टिपल्यामुळे समालोचक अविश्वसनीय असे म्हणत त्याचे कौतुक करत होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
साउदर्न ब्रेव संघाने मिळवला विजय
साउदर्न ब्रेवच्या १४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ॲडम रॉसिंगटन संघाने ४५ धावांची खेळी केली होती. तर, जोश इंग्लिसने ५५ धावांची खेळी केली होती. इतर कुठल्याही खेळाडूला साजेशी कामगिरी करण्यात यश आले नाही. या सामन्यात साउदर्न ब्रेव संघाने ४ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडमधील स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव, ‘हा’ ५१ वर्षीय दिग्गज आढळला पॉझिटिव्ह
युएई नव्हे तर ‘या’ देशात होणार टी२० विश्वचषकातील सुरुवातीचे ६ सामने, जाणून घ्या यामागचे कारण
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीने धोनीसोबत जोडले नाते; फोटो शेअर करत म्हणाली, ‘होय, मी माहीची बहीण आहे’