---Advertisement---

असा रचला होता पंत-अश्विनने लॉरेन्सच्या विकेटचा सापळा, चाहत्याने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

On: मंगळवार, फेब्रुवारी 16, 2021 10:52 AM
---Advertisement---

नुकताच चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. पाहुण्या इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट आणि सलामीवीर डॅनियल लॉरेन्स फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. संघापुढे ४२९ धावांचे भलेमोठे लक्ष्य असल्याने या दोन्ही फलदाजांकडून मोठ्या भागिदारीची अपेक्षा होती. परंतु भारतीय फिरकीपटू आर अश्विन आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्या योजनेने इंग्लंडच्या अपेक्षांवर पाणी फेरले.

त्याचे झाले असे की, ३ बाद ५३ या धावसंख्येपासून पुढे इंग्लंडच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने युवा गोलंदाजांच्या हाती सुरुवातीची काही सोपवली. त्यानंतर डावातील २६ वे षटक टाकण्यासाठी फिरकी गोलंदाज अश्विन आला. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी लॉरेन्स असल्याचे पाहून अश्विनने अतिशय चपळाईने क्रिजेच्या बाहेरच्या बाजूला चेंडू टाकला.

आपल्या अपेक्षेपलीकडे वेगळ्याच बाजूने चेंडू येत असल्याचे पाहून लॉरेन्स गोंधळून गेला आणि चेंडू त्याच्या पायातून सरळ मागे यष्टीरक्षक पंतच्या दिशेने गेला. पंतनेही पटकन डाव्या बाजूला वळून चेंडू पकडला आणि यष्टीला लावला. अशाप्रकारे दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर अश्विनला मोठी विकेट मिळाली.

महत्त्वाची बाब अशी की, लॉरेन्सची विकेट काढण्याआधी अश्विनने पंतला जवळ जाऊन त्याच्यासोबत मिळून योजना बनवली. यावेळचा त्यांचा व्हिडिओ एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांना चांगलीच पसंती दर्शवली आहे.

लॉरेन्सच्या रुपात इंग्लंडला चौथा धक्का बसल्यानंतर बेन स्टोक्स मैदानावर उतरला. परंतु अश्विनच्या फिरकीपुढे हा डावखुरा फलंदाज ५ मिनिटही टिकू शकला नाही. अश्विनने विराट कोहलीच्या हातून ८ धावांवर त्याला झेलबाद केले. ही अश्विनच्या दुसऱ्या डावातील तिसरी विकेट ठरली.

महत्त्वाच्या बातम्या-

गुलीगत धोका! अश्विनचा चेंडू लॉरेन्सच्या पायातून पंतकडे, क्षणाचाही विलंब न करता पाठवला तंबूत

‘माझा नवराच सर्वांना ट्रोल करत आहे,’ अश्विनच्या लक्षणीय खेळीनंतर बायकोचं धमाकेदार ट्विट

नागालँडचा एकलव्य..! माजी दिग्गजाचे व्हिडीओ पाहून शिकला गोलंदाजी, आयपीएलचे ‘हे’ संघ बनवणार कोट्याधीश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---