---Advertisement---

आता अश्विनची नजर दोन भारतीय दिग्गजांच्या विक्रमावर, ‘हा’ कारनामा करण्यापासून २ पावले दूर

On: रविवार, नोव्हेंबर 28, 2021 12:02 PM
R Ashwin and KS Bharat
---Advertisement---

भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन याने अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. अनेक दिग्गज फलंदाज त्याच्या गोलंदाजी समोर गुडघे टेकताना दिसून येतात. तसेच मायदेशात आर अश्विनच्या गोलंदाजीची धार आणखी वाढते. काही महिन्यांपूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला होता. तसेच आता न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३ गडी बाद केले. आता त्याच्याकडे मोठा विक्रम करून दिग्गजांना मागे टाकण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

आर अश्विनने आतापर्यंत एकूण ८० कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ४१६ गडी बाद करण्यात यश आले आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात किंवा येणाऱ्या सामन्यात तो दिग्गज भारतीय गोलंदाज हरभजन सिंग आणि कपिल देव यांचा विक्रम मोडून काढू शकतो.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम अनिल कुंबळे यांच्या नावे आहे. अनिल कुंबळे यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ गडी बाद केले आहेत, तर माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांना ४३४ आणि हरभजन सिंगला ४१७ गडी बाद करण्यात यश आले आहे.

सर्वाधिक गडी बाद करण्याच्या बाबतीत हरभजन सिंगला मागे टाकण्यासाठी आर अश्विन अवघे २ पाऊल दूर आहे. तर कपिल देव यांचा विक्रम मोडून काढण्यासाठी त्याला आणखी १९ गडी बाद करावे लागणार आहेत. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाज बनण्यासाठी आणखी २०३ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवावा लागणार आहे.

आर अश्विनची कसोटी कारकीर्द
आर अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत एकूण ८० सामन्यात ४१६ गडी बाद केले आहेत. ज्यामध्ये त्याला ३० वेळेस त्याला एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम करण्यात यश आले आहे. तसेच फलंदाजी करताना त्याने आतापर्यंत एकूण २६८५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ५ शतक आणि ११ अर्धशतक झळकावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

न्यूझीलंडचा घाम काढणाऱ्या अक्षर पटेलने ‘लिमिटेड ओव्हर क्रिकेटर’ म्हणणाऱ्यांना दिले जोरदार प्रत्युत्तर; म्हणाला…

फक्त खेळाडूच नाही, तर निवडकर्ता ते प्रशिक्षक, सर्व भूमिका चोख बजावणाऱ्या अमरनाथांच्या ५ रोमांचक गोष्टी

चर्चा आयपीएल मेगा ऑक्शनच्या! २०२२ हंगामासाठी पंजाब किंग्स ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---