---Advertisement---

चर्चा आयपीएल मेगा ऑक्शनच्या! २०२२ हंगामासाठी पंजाब किंग्स ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

On: रविवार, नोव्हेंबर 28, 2021 8:50 AM
---Advertisement---

येत्या काही महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेत अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन संघांना प्रवेश देण्यात आला आहे. तर खेळाडूंचा लिलाव देखील करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघांना ३० नोव्हेंबर पर्यंत ४ खेळाडूंना रिटेन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करायला सुरुवात केली आहे, तर पंजाब किंग्ज संघ एक मोठा निर्णय घेऊ शकतो.

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. हा संघ प्लेऑफमध्ये पोहचू शकला नव्हता. ही निराशाजनक कामगिरी पाहता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, पंजाब किंग्ज संघ एकही खेळाडूला रिटेन करणार नाहीये. हा संघ ९० कोटी रुपयांसह आयपीएल २०२२ स्पर्धेच्या लिलावात सहभाग घेणार आहे.

आयपीएलमधील सध्याच्या आठ फ्रँचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल हा देखील पंजाब किंग्ज संघ सोडण्याच्या तयारीत आहे. तो येणाऱ्या हंगामात अहमदाबाद किंवा लखनऊ संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येऊ शकतो.

टेलिग्राफ इंडियाच्या वृत्तानुसार, पंजाब किंग्ज संघ रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांसारख्या अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करू शकतो. तसेच पंजाब किंग्ज संघ खेळाडूंना रिटेन करण्यासाठी केवळ ४ कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही समजत आहे, ज्यामुळे रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यापैकी एकाच खेळाडूला रिटेन केले जाऊ शकते.

आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाब संघाचे नेतृत्त्व केएल राहुलने अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने १३ सामन्यात ६२.६० च्या सरासरीने ६२६ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने ६ तुफानी अर्धशतक झळकावले होते. तसेच ऑरेंज कॅप मिळवण्याच्या शर्यतीत तो तिसऱ्या स्थानी होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा ऋतुराज गायकवाड हा या स्पर्धेत ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

“तू चेंडूला जास्त स्पिन करतो”, आर अश्विनने मागितलेल्या सल्ल्यावर ‘बापू’चे मजेशीर उत्तर, पाहा व्हिडिओ

ऍडलेड स्ट्रायकर्सला नमवत पर्थ स्कॉचर्स ठरला नवा महिला बिग बॅश ‘चॅम्पियन’ संघ

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा होणार रद्द? क्रीडामंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान आले समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---