भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौरा नुकताच पार पडला. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर हार्दिक पंड्यावर जोरदार टीका केली गेली. सोबतच मालिका गमावल्यानंतर हार्दिकने दिलेली प्रतिक्रिया देखील चर्चेचा विषय ठरली. याच पार्श्वभूमीवर भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन देखील हार्दिकशी सहमत असल्याचे दिसत नाही.
वेस्ट इंडीज संघ मागच्या काही वर्षांपासून सुमार प्रदर्शन करताना दिसला आहे. मात्र, भारतीय संघाला वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. याच पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील भारताच्या युवा संघावर जोरदार टीका देखील झाली. मात्र, हार्दिक या पराभवानंतरही दबावाद दिसला नाही. मालिका गमावल्यानंतर तो म्हणाला की, “संघाचे अंतिम ध्येय टी-20 विश्वचषक आहे आणि त्यासाठी अजून वेळ आहे.” आगामी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये वेस्ट इंडीज आणि अमेरिकामध्ये पार पडणार आहे. हार्दिकच्या मते संघ तयार करण्यासाठी वेळ आहे. मात्र, रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला असे वाटत नाही.
अश्विनने आपल्या युट्यूब चॅनलवर याबबात नाराजी व्यक्त केली. अश्विन म्हणाला की, “मला नाही वाटत टी-20 विश्वचषकासाठी आपल्याकडे जास्त वेळ बाकी आहे. मी कुणा एकाविषयीच बोलत नाहीये. किंवा कोणाचे समर्थन करत नाहीये. या सर्व गोष्टी नंतरच्या आहेत. पण युवा खेळाडू म्हणून तुम्ही वेस्ट इंडीजला जात आहात. तर त्याठिकाणी काही अडचणींचा समाना करावा लागणार आहे. स्थानिक खेळाडूंना त्याठिकाणची परिस्थिती माहीत आहे. पण पाहुण्या संघाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.”
अश्विनने पुढे एमएस धोनी (MS Dhoni) याचीही आठवण काढली. तो म्हणाला, “एमएस धोनी (MS Dhoni) आणि मला काही प्रशिक्षकांनी एक गोष्ट सांगितली होती. जेव्हा तुम्हा पराभूत होता, तेव्हा काहीतरी शिकत असता. पण जेव्हा तुम्ही जिंकल्यानंतर देखील काहीतरी शिकता, तेव्हा ते खेळाडू चॅम्पियन बनतात.” अश्विनने त्याव्यतिरिक्त या मालिकेतील जमेच्या बाजूंचा देखील उल्लेख केला. त्याने तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचे कौतुक केले. (R Ashwin disagrees with Hardik Pandya’s opinion after series loss against West Indies, also recalls MS Dhoni)
महत्वाच्या बातम्या –
मुकेशच्या टीम इंडियातील जागेवर दिग्गजाने ठेवले बोट! म्हणाला, “त्याला कशाला घेतात?”
दिग्गजाने समोर ठेवली सॅमसनची संपूर्ण कारकीर्द! म्हणाला, “आयपीएल बाजूला केली तर…”