---Advertisement---

शमी-बुमराहच्या ग्रँड वेलकमची प्लॅनिंग नक्की कोणी केली होती? आर अश्विनने केला खुलासा

---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला होता.या सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवून १-० ची आघाडी घेतली होती. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या सामन्याचे शिल्पकार ठरले होते. या दोघांनी मिळून नाबाद ८९ धावांची भागीदारी करून बॅकफूटवर असलेल्या भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. ज्यामुळे दोघांचे ड्रेसिंग रूममध्ये जंगी स्वागत करण्यात आले होते. आता आर अश्विनने या सेलिब्रेशनबद्दल मोठा खुलासा केला आहे.

आर अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “जेव्हा आम्हाला समजले की, ते दोघे (शमी आणि बुमराह) लंच करण्यासाठी येत आहेत. त्यावेळी विराट आला आणि म्हणाला की, ‘आपल्यापैकी सर्वच खेळाडू त्या दोघांचे स्वागत करण्यासाठी खाली जात आहे. जल्लोष असा झाला पाहिजे की, येणारी अनेक वर्ष लॉर्ड्सच्या मैदानावर आवाज घुमला पाहिजे.”

भारतीय संघाने या सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवला होता. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या २५ ऑगस्टपासून लीड्समध्ये पार पडणार आहे.

शमी – बुमराहने करून दिले पुनरागमन
सामन्याच्या पाचव्या दिवशी (१६ ऑगस्ट)या सामन्यात इंग्लंडचे पारडे जड होते. असे वाटू लागले होते की, भारतीय संघ हा सामना गमावणार. परंतु रिषभ पंत आणि ईशांत शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी संपूर्ण सामन्याचे समीकरण बदलून टाकले.

दोघांनी मिळून इंग्लिश गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केले. मोहम्मद शमीने या डावात तुफानी अर्धशतक झळकावत नाबाद ५६ तर जसप्रीत बुमराहने नाबाद ३४ धावांची खेळी. दोघांनी मिळून नाबाद ८९ धावांची भागीदारी केली. भारतीय संघाने दुसरा डाव २९८ धावांवर घोषित केला. तसेच इंग्लंड संघाला विजय मिळवण्यासाठी २७२ धावांचे आव्हान दिले होते.(R Ashwin disclosure this player had said to welcome bumrah and shami)

https://twitter.com/BCCI/status/1427246702394761222

भारतीय संघाने १५१ धावांनी मिळवला विजय
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलमीवीर फलंदाज लवकर माघारी परलते होते. त्यानंतर कर्णधार रूटने एकहाती झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला देखील मोठी खेळ खेळता आली नाही, तो अवघ्या ३३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर जोस बटलरने शेवटी २५ धावांची खेळी केली. परंतु त्याला देखील हा सामना वाचवता आला नाही.

अखेर भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजी समोर इंग्लिश फलंदाजांचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. हा सामना भारतीय संघाने १५१ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

जसप्रीत बुमराहच्या वेगवान गोलंदाजीला घाबरला होता जेम्स अँडरसन, क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांनी केला खुलासा

टी२० विश्वचषकात केवळ या सात फलंदाजांना शतक करण्यात आले आहे यश, भारताच्या केवळ सुरेश रैनाचा समावेश

ऑसी खेळाडू अन् प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्यात पेटला वाद, कारणही आहे मोठे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---