मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात नुकतीच २ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील कानपूरला झालेला पहिला सामना अनिर्णित राहिला होता, तर मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे झालेला दुसरा सामना भारतीय संघाने तब्बल ३७२ धावांनी जिंकून मालिका १-० अशी फरकाने जिंकली. असे असले तरी मुंबई कसोटीदरम्यान सर्वात जास्त कोणाची चर्चा झाली असेल, तर न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) याची. त्याने या सामन्यात खेळताना मोठा इतिहास रचला. त्यामुळे त्याचा भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनकडून (R Ashwin) सन्मान करण्यात आला.
एजाजने रचला इतिहास
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात एजाजने भारताच्या सर्व १० विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो कसोटीमध्ये एका डावात १० विकेट्स घेणारा जगातील केवळ तिसरा गोलंदाज ठरला. त्याच्यापूर्वी हा विक्रम अनिल कुंबळे आणि जिम लेकर यांनी केला होता.
अश्विनने दिली दाद
एजाजने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीची दाद त्याला आर अश्विनने दिली आहे. त्याने भारतीय संघाकडून त्याची ९९ क्रमांकाची जर्सी एजाजला भेट दिली (Gifted Test Jersey). या जर्सीवर भारतीय संघातील खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. एजाजही ही भेट पाहून खूश झाला.
मुंबई कसोटी संपल्यानंतर आर अश्विनने एजाजची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीदरम्यान त्याने ही जर्सी त्याला भेट दिली. या मुलाखतीचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केला असून त्याची छोटी झलक ट्वीटरवर शेअर करण्यात आली आहे.
Special Mumbai connect 👍
Secret behind 10-wicket haul 😎
A memorable #TeamIndia souvenir ☺️🎤 @ashwinravi99 interviews Mr Perfect 10 @AjazP at the Wankhede 🎤 #INDvNZ @Paytm
Watch this special by @28anand 🎥 🔽https://t.co/8fBpJ27xqj pic.twitter.com/gyrLLBcCBM
— BCCI (@BCCI) December 6, 2021
या मुलाखतीत एजाजने तो त्याच्या कमी उंचीमुळे वेगवान गोलंदाजीवरुव फिरकी गोलंदाजीकडे वळल्याचेही सांगतो. तसेच त्या दोघांमध्ये मुंबईबद्दलही चर्चा होते. खरंतच एजाज हा भारतीय वंशाचा खेळाडू असून त्याचा जन्म मुंबईत झाला आहे. पण वयाच्या ८ व्या वर्षी तो न्यूझीलंडला त्याच्या कुटुंबासह स्थायिक झाला.
A special moment with the spin twins 🤩@ashwinravi99 @AjazP pic.twitter.com/TImkJbFZIY
— ICC (@ICC) December 6, 2021
अश्विनचाही पराक्रम
मुंबई कसोटीदरम्यान आर अश्विनने भारतामध्ये ३०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. तो भारताचा अनिल कुंबळेनंतरचा दुसराच गोलंदाज आहे. तसेच मायदेशात ३०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा जगातील एकूण सहावा गोलंदाज आहे. त्याच्यापूर्वी मुथय्या मुरलीधरन, जेम्स अँडरसन, अनिल कुंबळे, स्टुअर्ट ब्रॉड आणि शेन वॉर्न यांनी असा कारनामा केला आहे.
India vs New Zealand Test Match 3rd – 7th December 2021 pic.twitter.com/iEks1MIMsf
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) December 6, 2021
एजाज पटेलकडूनही भेट
केवळ आर अश्विननेच नाही, तर एजाज पटेलनेही मुंबई क्रिकेट असोसिएशनला एक खास भेट दिली आहे. मुंबई क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी एजाजचा गौरव केला. त्यांनी त्याला सामन्याचे स्कोअरकार्ड फ्रेम करुन भेट दिला. त्यानंतर एजाजनेही १० विकेट्स घेताना वापरलेला चेंडू आणि त्याची जर्सी एमएसीएला भेट दिली.
महत्त्वाच्या बातम्या –
संघ वेगळे, पण नावांनी जोडले! मुंबई कसोटीनंतर वानखेडे स्टेडियमवर दिसले अनोखे दृश्य
“भाई किस लाईन मे आ गये आप”, पुजाराने षटकार मारताच सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?