बंगळुरू कसोटीत भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला आहे. दुसऱ्या कसोटीत भारताने श्रीलंकेला २३८ धावांनी पराभूत केले आहे. पहिली कसोटी मोहालीमध्ये, तर दुसरी कसोटी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडली. भारतीय संघानेही मालिका २-० ने जिंकली. विजयासाठी भारताने श्रीलंकेसमोर ४४७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. श्रीलंका संघ दुसऱ्या डावात २०८ धावांवरच सर्वबाद झाला. या मालिकेत भारतीय संघातील खेळाडूंनी मोठे विक्रम केले आहेत. या सामन्यानंतर रोहितने अश्विनचे कौतुक केले, तेव्हा तो भावूक झाल्याचे दिसला. (R Ashwin got emotional while praising Rohit Sharma)
या मालिकेत भारतीय संघाला श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतसारखे सकारात्मक फॉर्म मिळाले, पण ही मालिका अशा खेळाडूसाठीही लक्षात राहील, जो आता उंचीच्या शिखराकडे वेगाने पावले टाकत आहे. यानंतर विश्व कसोटी चॅम्पियनशीपमध्ये १०० विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज बनलेल्या आर अश्विनचे रोहित शर्माने (Rohit Sharma) कौतुक केले आहे.
Words of praise from #TeamIndia Captain @ImRo45 for the champion bowler @ashwinravi99 👏 👏#INDvSL | @Paytm pic.twitter.com/SKySkSMj13
— BCCI (@BCCI) March 14, 2022
आर अश्विनबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “जेव्हा आम्ही त्याला चेंडू देतो, तो सामना जिंकवण्यासाठी चांगली कामगिरी करतो. याबाबत तो निश्चितपणे सर्व काळ महान आहे, याबाबत काही शंकाच नाही.” जेव्हा रोहित शर्मा अश्विनबाबत बोलत होता, तेव्हा तो मान खाली घालून उभा होता आणि असे दिसत होते की, तेव्हा तो स्वत:ला सांभाळू शकत नव्हता. तो भावूक झाला होता.
रोहित शर्मा म्हणाला की, “त्याची मोठी कारकीर्द उरली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, तो अशीच कामगिरी करत राहील. आम्ही गुलाबी चेंडू कसोटी खेळण्याची सवय लावून घेत आहोत. प्रेक्षकांच्या उपस्थितीत हे अजून खास होईल.”
अश्विनने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत ११३ सामने खेळले असून १५१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने कसोटी कारकिर्दीत ८६ सामने खेळले असून ४४२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने टी२० क्रिकेटमध्ये ५१ सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ६१ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये अश्विनने १६७ सामने खेळले असून त्यात त्याने १४५ विकेट्स घेतल्या आहेत.
श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करूणारत्नेने शतक लगावले, परंतु त्याच्या संघाला यश मिळवून देण्यात तो यशस्वी झाला नाही. या सामन्यानंतर तो म्हणाला की, “आम्ही सामना जिंकलो असतो, तर मला आनंद झाला असता. मला माहित आहे की, आमचा संघ चांगला आहे, परंतु आम्ही चांगल्या सुरुवातीला मोठ्या डावात नाही बदलू शकलो. गोलंदाजीत सुद्धा आम्ही शानदार कामगिरी केली.”
या मालिकेत भारताच्या खेळाडूंनी मोठे विक्रम केल आहेत. यामध्ये रिषभ पंत, श्रेयस अय्यर, आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या खेळाडूंचा समावेश आहे.
महत्तवाच्या बातम्या-
कोण आहे तो अनोळखी खेळाडू, ज्याच्याकडे कसोटी मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहितने सोपवली ट्रॉफी?
WTC | आर आश्विनने जगातील सर्व गोलंदाजांना मागे टाकत ‘या’ यादीत पटकावले अव्वल स्थान