---Advertisement---

इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अश्विनने निवडली टीम इंडियाची प्लेइंग 11, रोहित-विराटच्या जागी कोण?

On: मंगळवार, मे 20, 2025 10:23 AM
---Advertisement---

भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. दरम्यान दोन्ही संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. (India vs England Test Series) मालिकेतील पहिला सामना (20 जून) रोजी खेळला जाईल. पण या कसोटी मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला. कारण भारताचे दिग्गज क्रिकेटर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. (Virat Kohli And Rohit Sharma Retired From Test Cricket) अशा परिस्थितीत, आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो की भारतीय संघात या दोघांची जागा कोण घेईल?

अशा परिस्थितीत, आता भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने यांनी पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. अश्विनने 11 खेळाडूंची निवड केली आहे जे पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा भाग असू शकतात. अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर भारतीय संघाबद्दल वक्तव्य केलं आहे.

अश्विनने केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांना सलामीवीर म्हणून स्थान दिले आहे. त्याच वेळी, तिसऱ्या क्रमांकासाठी अश्विनची निवड आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणारा साई सुदर्शन आहे. तसेच, शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर आहे, तर जडेजाला पाचव्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, रिषभ पंत यष्टिरक्षक म्हणून अश्विनची पसंती बनला आहे.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये दोन खेळाडूंचा समावेश करण्याबाबत अश्विन गोंधळलेला आहे. अश्विनने करुण नायर आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यावर पैज लावली आहे. अश्विनने कबूल केले आहे की करुण नायर किंवा नितीश कुमार रेड्डी यापैकी एका खेळाडूला अष्टपैलू म्हणून संधी मिळू शकते. गोलंदाजीसाठी अश्विनने शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांची निवड केली आहे. अश्विन म्हणाला, की हे 11 खेळाडू पहिल्या कसोटीसाठी सर्वात योग्य असू शकतात. (R Ashwin picks India’s playing 11 for first Test against England)

अश्विनने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ओपनिंगसाठी केएल राहुलची निवड केली आहे. म्हणजेच, अश्विनने रोहितच्या जागी राहुलची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. याशिवाय, चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीची जागा शुबमन गिलला देण्यात आली आहे. सध्या आयपीएलमध्ये हे दोन्ही खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---