---Advertisement---

‘बाबा, यापूर्वी तुम्हाला असं कधीच पाहिलं नाही’, अश्विनला निळ्या जर्सीत पाहून लेकही झाली चकित

On: सोमवार, ऑक्टोबर 18, 2021 1:35 PM
---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे. रविवारी (१७ ऑक्टोबर) या स्पर्धेतील पात्रता फेरीतील पहिले २ सामने पार पडले. तर सोमवारी (१८ ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सराव सामन्याची लढत पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने भारतीय संघाची जर्सी घालून एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ नवीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. १३ ऑक्टोबर या जर्सीचे अनावरण करण्यात आले होते. तर आता ही जर्सी खेळाडूंपर्यंत पोहोचली आहे. तुम्ही विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंना या जर्सीमध्ये पाहिलं होते. अशातच आता आर अश्विनने देखील आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतीय संघाची जर्सी घातली आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

आर अश्विनने भारतीय संघाची जर्सी घालून फोटो शेअर केला आणि लिहिले की, “जेव्हा तुमची मुलगी म्हणते की, पप्पा मी तुम्हाला यापूर्वी या जर्सीमध्ये कधीच पाहिलं नाही. यानंतरही मी तिला या फोटोमध्ये घेणार नाही असं होऊच शकत नाही.”

आर अश्विन गेली बरीच वर्षे कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करतोय. त्याला वनडे आणि टी-२० संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नव्हती. आता ४ वर्षानंतर त्याला टी -२० संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. जेव्हा त्याने भारतीय संघाची निळ्या रंगाची जर्सी घातली होती. त्यावेळी त्याची मुलगी खूप लहान होती.

https://www.instagram.com/p/CVIEroJMDNp/?utm_medium=copy_link

आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव,रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्‍मद शमी.
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर, अक्षर पटेल.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषक २०२१: भारत आणि पाकिस्तान संघांची ‘सार्वकालिन प्लेइंग इलेव्हन’, धोनी संघनायक तर…

आज भिडणार भारत आणि इंग्लंड संघ, प्लेइंग इलेव्हनसहित जाणून घ्या सामन्याबद्दल संपूर्ण माहिती

भारतीय मूळ असलेल्या पठ्ठ्याची पहिल्याच टी२० विश्वचषक सामन्यात नाद खुळा कामगिरी, चोपल्या नाबाद ७३ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---