---Advertisement---

भारतीय संघावरील चिंतेचे सावट गडद; ‘हा’ खेळाडू ब्रिस्बेन कसोटीत खेळण्याबद्दल साशंकता

On: बुधवार, जानेवारी 13, 2021 12:05 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतींचे ग्रहण लागले. मालिकेआधीच प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले असताना भर मालिकेतच मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रिषभ पंत, हनुमा विहारी या खेळाडूंनाही दुखापत झाली. हा धक्का बसला असतानाच भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील दुखापतीने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र हे कमी होते की काय, असे म्हणायची वेळ आता भारतावर आली आहे. सिडनी कसोटीत सामना अनिर्णीत ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणारा आर अश्विन पाठीच्या दुखण्याने त्रस्त असल्याचे वृत्त समोर आले आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार अश्विन ब्रिस्बेन कसोटीत खेळण्याची शक्यता ४० टक्केच आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत आता भरच पडली आहे.

जर अश्विन चौथ्या सामन्यात खेळला नाही, तर भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह या सामन्यात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अश्विनच्या जागी टी नटराजन किंवा शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. तसेच अश्विन तंदुरुस्त असून सामन्यात खेळला तरी जडेजाच्या जागी संघ व्यवस्थापन वाॅशिंग्टन सुंदरला खेळवण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.

सुंदर ऑफस्पिन गोलंदाजीसह उपयुक्त फलंदाजी करत असल्याने त्याला प्राधान्य मिळू शकते. कारण कुलदीप यादव फिरकी गोलंदाज म्हणून उपलब्ध असला तरी ब्रिस्बेनला धावा काढणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ब्रिस्बेनमध्ये नक्की कोणाला संधी मिळेल, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! भारताची फुलराणी सायना नेहवालचा कोरोना अहवाल निगेटिव्ह; थायलंड ओपनमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा

टीम इंडियाच्या खेळाडूंच्या तक्रारींची बीसीसीआयकडून दखल, ब्रिस्बेनच्या हॉटेलमध्ये सोयी-सुविधांचा अभाव

धक्कादायक! दहशतवाद्यांच्या बातमीसोबत छापला विराट-अनुष्काचा फोटो, सोशल मीडियावर कडाडून टीका; पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---