भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यानुसार दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याद्वारे भारताचा फिरकीपटू आर अश्विन पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली होती. अशात दमदार पुनरागमनासह दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याच्या एका शानदार विक्रमावर अश्विनची नजर असणार आहे.
हरभजनने १९९८ ते २०१३ या कालावधीत घरेलू मैदानावर एकूण ५५ कसोटी सामने खेळले होते. यादरम्यान २.६९च्या इकोनॉमी रेटने त्याने २६५ विकेट्स घेतल्या होत्या. याबाबतीत अश्विन हरभजनपेक्षा केवळ १२ विकेट्सनी मागे आहे. अश्विनने २०११-२०१९ दरम्यान मायभूमीत ४३ कसोटी सामने खेळले असून २५४ विकेट्स काढल्या आहेत. जर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने १२ हून अधिक विकेट्स घेतल्या तर हरभजनला पिछाडीवर टाकत त्याच्या दुसऱ्या स्थानावर ताबा मिळवेल.
भारताकडून घरेलू मैदानावर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या विक्रमात माजी गोलंदाज अनिल कुंबळे अव्वलस्थानी आहेत. त्यांनी भारतात ६३ कसोटी सामने खेळत सर्वाधिक ३५० विकेट्स चटकावल्या होत्या.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय
जर घरेलू आणि परदेशातील कसोटी सामन्यांची मिळून आकडेवारी पाहायची झाली तर, याबाबतीतही कुंबळे प्रथम स्थानावर विराजमान आहेत. त्यांनी एकूण १३२ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्त्व करताना सर्वाधिक ६१९ विकेट्स घेतल्या होत्या. तर अष्टपैलू कपिल देव हे १३१ कसोटी सामन्यातील ४३४ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहेत. तसेच हरभजन (१०३ सामने ४१७ विकेट्स) आणि अश्विन (७४ सामने ३७७ विकेट्स) हे या विक्रमाच्या यादीत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
लवकरच भिडणार भारत आणि इंग्लंड संघ
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दौऱ्याची सुरुवात ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने होणार आहे. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १२ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळविण्यात येणार आहे. तर अखेरचे दोन सामने अहमदाबादच्या नवीन मोटेरा मैदानावर खेळवले जातील.
महत्त्वाच्या बातम्या-
हा कसला प्रकार! क्रिकेटपटूंनी चालू सामन्यात मैदानावरच काढले कपडे, पाहा मजेशीर व्हिडिओ
…अन् ‘या’ पठ्ठ्याने अवघ्या २५व्या वर्षी झळकाविले त्रिशतक!
पंतप्रधानांचे ट्विट रिट्विट करून फसला विराट, चाहत्यांनी धरले धारेवर