भारत आणि श्रीलंका संघात दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअम येथे सुरू आहे. यामध्ये भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने खास विक्रम केला आहे. त्याने कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला पछाडलं आहे.
आर अश्विनने (R Ashwin) ८६ कसोटी सामने खेळताना १६२ डावांमध्ये २.७७च्या इकॉनॉमी रेटने ४४० विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने (Dale Steyn) ९३ कसोटी सामने खेळताना १७१ डावांमध्ये ३.२५च्या इकॉनॉमी रेटने ४३९ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत स्टेनला मागे टाकले आहे. अशाप्रकारे तो कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा ८वा गोलंदाज ठरला आहे.
R Ashwin 440 Test wickets in his 86th match, now go past Dale Steyn's tally of 439 in 93 Tests.
Inly seven other bowlers have more Test wickets than Ashwin, whose next target is Courtney Walsh's 519.#IndvSL #IndvsSL#DaynightTestmatch— Mohandas Menon (@mohanstatsman) March 14, 2022
भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विन दुसरा खेळाडू ठरला आहे. भारतीय संघाकडून खेळताना अनिल कुंबळेने कसोटी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १३२ सामने खेळताना २३६ डावांमध्ये २.६९ च्या इकॉनॉमी रेटने ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पहिल्या १० खेळाडूंमध्ये कुंबळे (४ था क्रमांक) आणि अश्विनसोबत (८वा क्रमांक) कपिल देव (१०वा क्रमांक) यांचाही समावेश आहे. कपिल देव यांनी १३१ कसोटी सामने खेळताना २२७ डावांमध्ये २.७८ च्या इकॉनॉमी रेटने ४३४ विकेट्स घेतल्या आहेत.
एकूण कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमाबद्दल बोलायचं झालं, तर अव्वल क्रमांकावर श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आहे. मुरलीधरनने १३३ सामन्यांमध्ये २३० डावांमध्ये २.४७ च्या सर्वोत्तम इकॉनॉमी रेटने ८०० विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नचा समावेश असून त्याने १४५ सामन्यांमध्ये २७३ डावांमध्ये २.६५ च्या इकॉनॉमी रेटने ७०८ विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
८००- मुथय्या मुरलीधरन
७०८- शेन वॉर्न
६४०- जेम्स अँडरसन
६१९- अनिल कुंबळे
५६३- ग्लेन मॅकग्रा
५३७- स्टुअर्ट ब्रॉड
५१९- कर्टनी वॉल्श
४४०*- आर अश्विन
४३९- डेल स्टेन
४३४- कपिल देव
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे रणजी ट्रॉफीत २६६ धावा कुटणारा झारखंडचा पठ्ठ्या? पाकिस्तानी दिग्गजालाही ठरलाय वरचढ
दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ सुस्साट, इंग्लंडला ९ धावांनी झुकवत नोंदवली विजयाची हॅट्रिक
महान भारतीय कर्णधारही बळींचा पंचक घेणाऱ्या बुमराहच्या गोलंदाजीच्या प्रेमात; म्हणाले, ‘एवढी प्रतिभा…’