भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताचा ८ गडी राखून पराभव केला आहे.भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात सुमार फलंदाजी केली व पूर्ण संघ ३६ धावांवर बाद झाला. मात्र या निराशाजनक कामगिरीत फिरकीपटू आर अश्विनची गोलंदाजी भारतासाठी आशेचा किरण ठरली आहे. अश्विनने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ४ फलंदाजांना बाद केले. सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर पत्रकारांशी बोलताना अश्विनने आपल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
विदेशात या दोन बाबी महत्त्वाच्या
पत्रकारांशी बोलताना अश्विन म्हणाला, “विदेशात गोलंदाजी करतांना फिरकीपटूने दोन बाबींवर लक्ष देणे गरजेचे असते त्या म्हणजे किती धावा रोखल्या व किती बळी मिळवले. जेव्हा मी विदेशात खेळतो तेव्हा माझे लक्ष या दोन्ही बाबींकडे असते, कारण विदेशात परिस्थिती फिरकीपटूंच्या विरुद्ध असते.”
विदेशात देखील माझी कामगिरी उत्तम
आपल्या विदेशातील कामगिरीबद्दल बोलतांना अश्विन म्हणाला, ‘”माझी विदेशात कामगिरी नेहमी उत्तम राहिलेली आहे. काही अपवाद वगळले तर मी मागील १८ महिन्यांत विदेशात देखील चांगली गोलंदाजी केली आहे.”
पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघ २६ डिसेंबर पासून दुसऱ्या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजा घेवून भारतात परतणार आहे. अशा परिस्थितीत अश्विनकडून भारतीय संघाला पहिल्या सामन्याप्रमानेच उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.
संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– टीम इंडियाचा लाजीरवाणा पराक्रम आणि माजी खेळाडूंच्या तिखट प्रतिक्रिया, चाहत्यांकडूनही मीम्सचा भडीमार
– अब जिंदा रेहने के लिये बचा ही क्या है! टीम इंडियाच्या वाईट प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस