भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने जेव्हापासून आंतरराष्ट्रीय संघाचे नेतृत्व सोडले, तेव्हापासून अनेकांनी भारताचे नेतृत्व केले. रोहित शर्मा याच्यासोबत हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, शिखर धवन यांचा समावेश आहे. कर्णधारपदामध्ये सतत बदलामुळे कुठेतरी संघाचा खेळही कमी झाल्यासारखा वाटला. हार्दिकला टी20चा कर्णधार अजून तरी घोषित केले नाही, मात्र तोच भविष्यात भारताच्या टी20 संघाचा कर्णधार असण्याची दाट शक्यता आहे.
भारताच्या कर्णधारपदाची चर्चा सुरू असताना काही अनुभवी खेळाडूंकडे दुर्लक्ष झाले. तो भारताचा महत्वाचा आणि सामना जिंकून देणारा अष्टपैलू खेळाडू आहे. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin). त्याला भारतीय संघात येऊन एक दशकाहून अधिक काळ झाला आहे, मात्र कर्णधार म्हणून कधीच त्याचे नाव समोर आले नाही. त्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2018च्या हंगामात पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते. भारताच्या नेतृत्वाची बाब समोर आली तर त्याच्याबाबत डोळेझाक करण्यात आली. तसेच भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार आर अश्विन किती रुचण्यासारखे वाटते?
अश्विनला कर्णधार म्हणून का पाहिले गेले नाही, यामागचे मुख्य कारण तर समोर आले नाही. परंतु तो बाहेरील मैदानांवर संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सतत राहिला नाही हे एक कारण असू शकते. असे असले तरी त्याने स्वत: त्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
एका वृत्त माध्यमाला मुलाखत देताना अश्विन म्हणाला, “मी सर्वच प्रकारच्या भुमिकेसाठी तयार आहे, मात्र भारताचे नेतृत्व करण्याची संधी न मिळणे हे काही झोप उडवणारे नाही. जेव्हा संन्यास घेईल तेव्हा माझ्याकडे त्याचे उत्तर असेल. तोपर्यंत मी संधींची प्रतिक्षा करत राहणार आणि स्वप्न पाहत राहणार.”
हार्दिकच्या नेतृत्वाचे कौतुक करताना अश्विन म्हणाला, “हार्दिकच्या नेतृत्वाची बाबच निराळी. तो एक स्मार्ट क्रिकेटपटू आहे. तो नेतृत्व करताना शांत असतो. माझ्यामते, त्याच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करेल.” हार्दिककडे भारताचा टी20चा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. त्याने आयर्लंड, न्यूझीलंड दौऱ्यात टी20 सामने जिंकले आहेत. नुकतेच त्याने घरच्या मैदानावर श्रीलंकेचा 2-1 असा पराभव केला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉचे झंझावाती शतक, वादळी खेळी करत बीसीसीआयच्या निवड समितीला फटकारले!
“टीम इंडियाला त्रिपाठीसारख्या खेळाडूंची गरज”, विश्वविजेत्या खेळाडूने केले तोंडभरून कौतुक






