---Advertisement---

वयाच्या ४२व्या वर्षापर्यंत फिरकीपटू अश्विन क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणार!

On: शुक्रवार, मे 28, 2021 12:26 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विन हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. नुकतेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० पेक्षा अधिक गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. अशातच ऑस्ट्रेलिया संघाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग याने आर अश्विनबद्दल भाष्य केले आहे.

इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या जोडीने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. याच मालिकेत अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. अशातच ब्रॅड हॉगला विश्वास आहे की, अश्विन जर आणखी ८ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला; तर तो मुथैय्या मुरलीधरनचा विक्रम मोडू शकतो. अश्विन सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत १५ व्या स्थानावर आहे.

ब्रॅड हॉगने ‘टाइम्‍स नाव न्‍यूज डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “अश्विन आता ३४ वर्षांचा आहे. मला वाटते की तो ४२ वर्षांचा होईपर्यंत कसोटी क्रिकेट खेळू शकेल. माझे मत असे आहे की, त्याची फलंदाजी कमकुवत होत जाईल. परंतु वेळ पुढे जाईल तशीच त्याची गोलंदाजी आणखी घातक होईल. मला त्याला अजून कमीत कमी ६०० गडी बाद करताना पाहायचे आहे. तो मुथैया मुरलीधरनचा विक्रम देखील मोडू शकतो. त्याचे कारण असे की, तो परिस्थिती पाहून गोलंदाजी करतो आणि त्याच्यात ती भूक जाणवते की, त्याला आणखी प्रगती करायची आहे. ”

तसेच तो पुढे म्हणाला की, “इंग्लंडच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तो काउंटी क्रिकेट खेळला आहे आणि म्हणूनच गेल्या काही वर्षांत तो इतका यशस्वी झाला आहे. तो निश्चितच आता जागतिक सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहे. परंतु नियमांमध्ये आणि परिस्थितीमध्ये अनेक बदल झाल्यामुळे आपण त्याला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज म्हणू शकत नाही.”

येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथम्पटन येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. त्यांनतर भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यावर अश्विनची उल्लेखनीय कामगिरी भारतीय संघाच्या विजयाचे प्रमुख कारण ठरू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

कसोटी चॅम्पियनशीप फायनल अनिर्णीत किंवा ड्रॉ झाली तर कोण असणार विजेता? घ्या जाणून

‘विलियम्सन भारतीय असता तर तो रहाणेचा…,’ इंग्लिश दिग्गजाचे विवादास्पद विधान; झाला ट्रोल

रांचीकर धोनीचे पिंपरी-चिंचवडमधील घर पाहिले आहे का? वाचा त्याच्या पुण्यातील निवास स्थानाविषयी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---