बॉर्डर-गावस्कर मालिकेचा तिसरा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला गेला. हा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यानं अचानक अशाप्रकारे निवृत्तीची घोषणा केल्यानं भारतीय चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता निवृत्तीच्या जवळपास एका महिन्यानंतर अश्विननं यावर मनमोकळी चर्चा केली आहे.
आपल्या युट्यूब चॅनलवर अश्विन त्याच्या निवृत्तीसंबंधी बोलला. अश्विननं स्पष्ट केलं की, त्याला आणखी क्रिकेट खेळायचं आहे, मात्र तो भारतीय संघाकडून खेळणार नाही. अश्विन म्हणाला की, तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणं जारी ठेवेल. अश्विननं हे देखील सांगितलं की, त्यानं योग्य वेळी निवृत्ती घेतली. अश्विन म्हणाला, “मी अजूनही क्रिकेट खेळू इच्छितो, मात्र भारतीय संघासाठी नाही. निवृत्तीची योग्य वेळ तीच असते, जेव्हा लोकं ‘का?’ असं विचारतात, ‘का नाही?’ असं नाही.
अश्विन पुढे बोलताना म्हणाला की, त्याला वाटतं त्याच्यातील क्रिएटीव्हिटी संपली आहे. तो म्हणाला की, त्याला मालिकेच्या पहिल्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही. तो फक्त दुसऱ्या कसोटीत खेळला. त्याची चौथ्या कसोटीतही खेळण्याची शक्यता नव्हती. यामुळे त्यानं निवृत्तीचा निर्णय घेतला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी अश्विन आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जनं अश्विनवर 9.75 कोटी रुपयांची बोली लावून त्याला आपल्या संघात शामिल केलं. तो यापूर्वी देखील या फ्रॅन्चाईजीकडून खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अश्विन तामिळनाडूकडून खेळतो. चेन्नईशिवाय अश्विन आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळला आहे.
हेही वाचा –
रेकाॅर्डब्रेक..! भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी, वनडेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली
“150 किलोपेक्षा जास्त सामानाची गरज…”, भारतीय खेळाडूंवर आकाश चोप्राची बोचरी टीका
स्मृती मंधानाचं नाव इतिहासात अजरामर! भारतासाठी हा मोठा रेकॉर्ड मोडला