IPL 2024 Auction: एकूण 333 खेळाडूंनी आयपीएल 2024 लिलावात आपले नाव नोंदवले आहे. यातील 214 भारतीय, तर 119 खेळाडू परदेशी आहेत. परदेशी खेळाडूंमध्ये नुकताच वनडे विश्वचषक 2023 गाजवणारा न्यूझीलंडचा 24 वर्षीय अष्टपैलू रचिन रवींद्र याचाही समावेश आहे. रचिनवर पहिली बोली चेन्नई सुपर किंग्स संघाने लावली. अखेरीस चेन्नईनेच त्याला आपल्या संघाचा भाग बनवले.
किती कोटींचा मालक?
रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याने आयपीएल 2024 लिलावात (IPL 2024) आपली बेस प्राईज 50 लाख रुपये ठेवली होती. यावेळी त्याला चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने 1 कोटी 80 लाख रुपये देऊन आपल्या संघाचा भाग बनवले. आता अष्टपैलू रचिन रवींद्र आयपीएल 2024 (Rachin Ravindra IPL 2024) हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दिसेल. रचिनचा हा पहिलाच आयपीएल हंगाम असेल. (Rachin Ravindra sold to CSK for 1 crore 80 lakh in IPL 2024 auction)
हेही वाचा-
IPL 2024 Auction: भारतीय संघाला नडणाऱ्या ट्रेविस हेडला हैदराबादने ‘एवढे’ कोटी देत केले मालामाल, आकडा पाहाच
Rovman Powell ठरला IPL 2024 Auctionमध्ये विकला जाणारा पहिला खेळाडू, राजस्थानने ‘एवढ्या’ कोटीत घेतलं ताफ्यात