टेनिस चाहत्यांसाठी काल मंगळवारी (19 नोव्हेंबर) एक निराशाजनक बातमी समोर आली. 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. ज्यामध्ये त्याला पराभव पत्करावा लागला. यासह पराभवासह त्याची कारकीर्द संपली. नदालने हा सामना 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये गमावला. नदालने आधीच गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. डेव्हिस चषकातील हा शेवटचा सामना असेल असे त्याने सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी (19 नोव्हेंबर) तो मैदानात दाखल झाला. ज्यामध्ये नदालचा सामना 80व्या क्रमांकाच्या बोटिक व्हॅन डी झांडस्चल्पशी झाला.
डच खेळाडू बोटिकने सामन्यात सुरुवातीपासूनच नदालला कडवी टक्कर दिली. त्याने पहिल्या सेटमध्ये नदालचा 6-4 अशा फरकाने पराभव केला. दुसऱ्या सेटमध्येही बोटिकने 5-4 अशी आघाडी घेतली होती. पण नदालने पुनरागमन करत 4-3 अशी आघाडी घेतली. मात्र त्याला हा सेट जिंकता आला नाही. बोटिकने दुसरा सेटही 6-4 असा जिंकून सामना जिंकला.
डेव्हिस कपमधील शेवटचा सामना खेळण्यापूर्वी नदाल भावूक झाला होता. राष्ट्रगीत सुरू असताना नदाल भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रूही वाहत होते. त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, शेवटचा सामना जिंकून नदाल चाहत्यांना आनंद देऊ शकला नाही. पराभवानंतर त्याच्या चाहत्यांची दुहेरी निराशा झाली.
The 🇪🇸 national anthem sets the emotional tone for tonight in Malaga 🥺 pic.twitter.com/MbpfxmJXRV
— US Open Tennis (@usopen) November 19, 2024
चार वर्षांपूर्वी स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर निवृत्त झाला. आता नदालनेही खेळाला अलविदा केला आहे. फेडररने 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली होती. या यादीत नदाल दुसऱ्या स्थानावर आहे.
सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे पुरुष खेळाडू
24 – नोव्हाक जोकोविच
22 – राफेल नदाल
20 – रॉजर फेडरर
14 – पीट सॅम्प्रास
12 – रॉय इमर्सन
नदालने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने त्याच्या अलीकडच्या काळातील संघर्ष आणि खेळाचा त्याच्या शरीरावर झालेला शारीरिक परिणाम याबद्दल सांगितले.
ज्यात नदाल म्हणाला होता, “माझी शेवटची स्पर्धा डेव्हिस कप फायनल असेल, ज्यामध्ये मी देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे, यासाठी मी खूप उत्साहित आहे. माझा विश्वास आहे की व्यावसायिक टेनिसपटू म्हणून माझ्या पहिल्या विजयाच्या आनंदानंतर मी आता शेवटच्या टप्प्यावर आलो आहे. मी स्वतःला सुपर सुपर लकी समजतो की मी खूप काही अनुभवले आहे.”
हेही वाचा-
IND vs AUS: प्रशिक्षक माॅर्नी मॉर्केलचा याॅर्कर? पर्थ कसोटीत शुबमन गिलची सरप्राईज एंट्री होणार!
पर्थ कसोटीत जडेजा किंवा सुंदरला नाही, तर या फिरकीपटूला मिळणार संधी, पाहा नेमकं कारण
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अश्विन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर, अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज ठरणार