---Advertisement---

विश्वचषकाआधी आफगाणिस्तानच्या संघात मोठा बदल, राशिद खानला केले कर्णधार

On: शनिवार, एप्रिल 6, 2019 3:47 PM
---Advertisement---

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषकाआधी एक मोठा निर्णयही घेतला आहे. त्यांनी असगर अफगान याचे कर्णधारपद काढून घेतले आहे. त्याच्या ऐवजी तीन क्रिकेट प्रकारासाठी तीन वेगवेगळे कर्णधार आणि उपकर्णधार नेमण्यात आले आहे. याबद्दल शुक्रवारी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ट्विटर अकांउंटवर माहिती देण्यात आली आहे.

त्यानुसार वनेड संघाचे नेतृत्व गुलाबदीन नाईबकडे, टी20चे कर्णधारपद राशिद खानकडे आणि रहमत शाहकडे कसोटी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

तसेच राशिदकडे वनडेचे उपकर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. तर, शफीकउल्लाह शफीकला टी20 आणि हशमतउल्लाह शाहिदीकडे कसोटीचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगरच्या नेतृत्वाखाली वनडेमध्ये अफगाणिस्तान संघाने 56 सामन्यात 31 विजय मिळवले आहेत. तसेच टी20 मध्ये 46 सामन्यांपैकी 37 विजय मिळवले आहेत. त्याचबरोबर असगरच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने पहिला कसोटी विजयही मिळवला आहे.

https://twitter.com/ACBofficials/status/1114069438364626945

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयावर मात्र राशिद खान आणि मोहम्मद नबी या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी याबद्दल ट्विट केले आहे.

राशिदने म्हटले आहे की ‘निवडसमितीचा आदर राखत आहे, पण या निर्णयाशी मी सहमत नाही. कारण हा निर्णय बेजबाबदार आणि पक्षपाती आहे. विश्वचषक समोर असताना असगर अफगान आमच्या संघाचा कर्णधार म्हणून कायम असायला हवा होता. संघाच्या यशात त्याचा मोठा वाटा आहे.’

‘विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेआधी कर्णधार बदलल्याने संघात अस्थिरता निर्माण होईल आणि संघाच्या मानसिकतेवरही परिणाम होईल.’

तसेच नबीने म्हटले आहे की ‘संघाचा वरिष्ठ खेळाडू असल्याने आणि अफगाणिस्तान क्रिकेटच्या प्रगतीचा साक्षीदार असल्याने मला वाटते की विश्वचषकाआधी कर्णधार बदलने योग्य नाही. असगरच्या नेतृत्वाखाली संघात चांगला ताळमेळ होता आणि माझे वैयक्तिक मत आहे की आमचे नेतृत्व करण्यासाठी तो योग्य व्यक्ती आहे.’

महत्त्वाच्या बातम्या – 

चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी…

२०१९ विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघाने घोषीत केला या संभाव्य खेळाडूंचा संघ

ऑस्ट्रेलियाच्या या माजी क्रिकेटपटूने वेष बदलून केली चेन्नईच्या मार्केटमध्ये खरेदी, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment