Loading...

पोस्टर बॉय राहुल चौधरीने प्रो कबड्डीमध्ये रचला मोठा इतिहास

मुंबई। प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात काल(29 जूलै) 16 वा सामना तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स संघात पार पडला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात पटना पायरेट्सने 24-23 अशी बाजी मारत सामना जिंकला.

असे असले तरी तमिळ थलायवाजचा स्टार रेडर राहुल चौधरीने या सामन्यात खेळताना प्रो कबड्डीमध्ये नवा इतिहास रचला आहे. तो प्रो कबड्डीमध्ये 900 गुण मिळवणारा पहिलाच कबड्डीपटू ठरला आहे.

त्याने कालच्या सामन्यात 14 रेड करताना 5 गुण मिळवले आणि 900 गुणांंचा टप्पा पूर्ण केला. या 900 गुणांपैकी त्याने 846 गुण रेडींगमध्ये मिळवले आहेत. तो सर्वाधिक रेडींग गुण मिळवण्याच्या यादीतही दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलने प्रो कबड्डीमध्ये आत्तापर्यंत 103 सामने खेळले आहेत.

प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक गुण मिळवण्याच्या यादीत राहुलपाठोपाठ दुसऱ्या स्थानी डुबकी किंग परदिप नरवाल असून त्याने 88 सामन्यात 883 गुण कमावले आहे. परदिपलाही या हंगामात 900 गुण कमावण्याची संधी आहे.

प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे कबड्डीपटू:

Loading...

900 – राहुल चौधरी (103 सामने)

883 – परदीप नरवाल (88 सामने)

802 – दीपक हुडा (105 सामने)

765 – अजय ठाकूर (105 सामने)

620 – रोहित कुमार (75 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

प्रो कबड्डीच्या या सामन्यासाठी विराट कोहलीची खास उपस्थिती

Loading...

युवराज खेळत असलेल्या लीगचा सामना बाॅंम्बच्या अफवेने पुढे ढकलला

You might also like
Loading...