भारत आणि वेस्ट इंडिज (india vs west indies) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामान्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने विजय मिळवला होता. आता हे दोन्ही संघ ३ टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना १६ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआयने ) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड चर्चा करताना दिसून येत आहे. हे दोघे ही सोशल डिस्टन्सिंगमुळे एकमेकांपासून दूर उभे आहेत. तसेच त्यांनी मास्क घातल्याचे देखील दिसून येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत ३६ हजार लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.
या फोटोला हटके कॅप्शन देत त्यांनी लिहिले की, “जेव्हा भारतीय क्रिकेटचे दोन महान खेळाडू ईडन गार्डन्सवर एकत्र येतात..” या दोघांनी आतापर्यंत भारतीय संघासाठी या मैदानावर अनेक सामने खेळले आहेत. दोघांनी ही भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. तर राहुल द्रविडला भारतीय क्रिकेटची भिंत असे म्हटले जात होते.
रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. गतवर्षी झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ समाप्त झाला होता. राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या दोघांनी एकत्र पदार्पण केले होते. १९९४ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत या दोघांनी आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती.
महत्वाच्या बातम्या :
डोमेस्टिक क्रिकेटचा ‘बादशहा’ वसीम जाफरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी






