---Advertisement---

भारतीय संघाकडून कोच राहुल द्रविडचा ४९ वा वाढदिवस दणक्यात साजरा, फोटो होतायेत व्हायरल

On: बुधवार, जानेवारी 12, 2022 10:08 AM
Rahul-Dravid
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका (India tour of South Africa)  दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम कसोटी सामना केपटाऊनच्या (Cape town) मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी (११ जानेवारी ) भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी आपला ४९ वा वाढदिवस साजरा केला. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

राहुल द्रविड हे भारताच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहेत. सध्या ते भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या ताफ्यात त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. ज्याचे फोटो मोहम्मद शमीने (Mohammad Shami) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Rahul Dravid birthday celebration)

दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मोहम्मद शमीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, राहुल द्रविड केप कापताना दिसून येत आहेत, तर दुसऱ्या एका फोटोमध्ये रिषभ पंत आणि मोहम्मद शमी राहुल द्रविड यांना केक खाऊ घालताना दिसून येत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उमेश यादव, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा आणि संघातील इतर खेळाडू उपस्थित होते.

दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने राहुल द्रविडला ट्वीट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सचिनने ट्विट करत लिहिले की, “जॅमी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला उत्तम आरोग्य लाभो आणि तिसर्‍या कसोटीसाठी शुभेच्छा.”

तसेच माजी भारतीय फलंदाज वसीम जाफरने (Wasim Jaffer) देखील ट्वीट करत राहुल द्रविडला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले की, “कर्णधार, सलामीवीर फलंदाज, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, यष्टिरक्षक, आयसीसी स्पर्धचे जेतेपद मिळवणारे कर्णधार, माजी एनसीए प्रमुख आणि आता भारताचे प्रशिक्षक. पण त्याहीपेक्षा एक महान व्यक्तिमत्त्व. सर्व ट्रेडच्या मास्टरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ”

महत्वाच्या बातम्या :

सचिन तेंडूलकरची बीसीसीआयमध्ये होणार एन्ट्री? वाचा काय म्हणाले जय शाह

भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिला-वहिला आंतरराष्ट्रीय सामना पाहिलाय का? बघा हा व्हिडिओ

हे नक्की पाहा :

द्रविडला 'जॅमी' टोपणनाव पडलं तरी कसं? | Story behind Rahul Dravid Nickname JAMMY

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---