---Advertisement---

शांत द्रविडचे भन्नाट सेलेब्रेशन! आयसीसीने शेयर केलायं व्हिडिओ, एकदा पाहाच

On: सोमवार, ऑक्टोबर 24, 2022 10:38 AM
Rahul Dravid Celebration
---Advertisement---

टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या प्रवासाची सुरूवात भारतीय संघाने उत्तम केली. रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केला. भारताच्या या रोमहर्षक विजयाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बहुतांश व्हिडिओमध्ये भारताचे खेळाडू आणि चाहते जल्लोष करताना दिसत आहेत. भारताकडे आनंदाचे वातावरण असताना पाकिस्तान दु:खात दिसला. आयसीसीने शेयर केलेल्या या व्हिडिओने तर पाकिस्तानच्या स्थितीत आणखी भर घातली आहे.

आयसीसीने शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये सुरूवातीला भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चिंतेत दिसतो, मात्र जेव्हा आर अश्विन शेवटच्या चेंडूवर धाव घेतो आणि संघाला विजय मिळवून देतो तेव्हा संघाच्या आणि चाहत्यांचा आनंदाला पारावार नसतो. यावेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची रिऍक्शन पाहण्याजोगी आहे. नेहमी शांत स्वभावाचे द्रविड या व्हिडिओमध्ये मोठ्यांने ओरडताना आणि खेळाडू, कोचिंग स्टाफसोबत सेलेब्रेशन करताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये रोहितने विराट कोहली (Virat Kohli) याला खांद्यावर उचल्याचेही दिसत आहे. द्रविड यांनी कोहलीची गळाभेट घेतल्याचा क्षणही कैद झाला आहे. विजयानंतर कोहली चाहत्यांचे अभिवादन करण्यासाठी मैदानाचे चक्कर मारतो. तेव्हा त्याच्यासोबत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि दिनेश कार्तिकही असतात.

भारताने या सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी केली. पाकिस्तानने फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट्स गमावत 159 धावा केल्या. यामुळे शान मसूद (52*) आणि इफ्तिखार अहमद (51) यांनी अर्धशतके केली. भारताच्या गोलंदाजीत हार्दिक आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.

https://twitter.com/ICC/status/1584231304333119489?s=20&t=W0sgMUoQHvzhwtqy5Yjqqw

लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित-राहुल लवकर बाद झाले. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी विकेट देत भारतीय चाहत्यांची चिंता वाढवली. तेव्हा विराट-हार्दिक जोडीने शतकी भागीदारी केली. विराटने नाबाद 82 आणि हार्दिकने 40 धावा केल्या. भारताचा पुढील सामना 27 ऑक्टोबरला नेदरलॅंड्सविरुद्ध आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणारे दोन गोलंदाज, दुसरे नाव आहे चकीत करणारे
VIDEO: वडिलांची आठवण येताच हार्दिकच्या अश्रूंचा फुटला बांध; इरफानच्या गळ्यात पडत धाय मोकलून रडला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---