---Advertisement---

हेड कोच द्रविड यांच्या ‘त्या’ पाऊलानंतर उपस्थित झाले प्रश्न; रोहितसोबत वेगळं वागले, तर विराटसोबत वेगळं

DRAVID-KOHLI
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघात सध्या बरेच फेरबदल पाहायला मिळत आहेत. सध्या भारताचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) गेला आहे, जिथे त्यांना आतापर्यंत एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. परंतु या दौऱ्याची सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट (Indian Cricket) मध्ये मोठा वाद उफळला आहे. बीसीसीआयच्या विराट कोहली (Virat KOhli) याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून (ODI Captaincy) काढण्याच्या निर्णयानंतर भारतीय क्रिकेटमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी विराटने एक पत्रकार परिषद (Press Conference) केली, ज्यानंतर हे प्रकरण अजूनच चिघळले आहे. यादरम्यान भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक (Indian Team Head Coach) राहुल द्रविड (Rahul Dravid) हे मात्र शांत (Rahul Dravid’s Silence) आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच त्यांनी विराटकडे पाठ फिरवली असल्याचे दिसले आहे. 

विराटसोबत पत्रकार परिषदेत नाही गेले द्रविड
सहसा कोणताही क्रिकेट संघ द्विपक्षीय मालिकेसाठी कोणत्या देशाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी किंवा आयसीसीच्या कोणत्या स्पर्धेपूर्वी, त्या संघाचा कर्णधार मुख्य प्रशिक्षकांसह परिषद घेतात. या पत्रकार परिषदेत संघाची रणनिती, दौऱ्यातील आव्हाने आणि इतर मुद्द्यांवर प्रश्न-उत्तरे विचारली जातात. क्रिकेटमध्ये असा कोणता नियम नाहीये की, अशाप्रकारची पत्रकार परिषद व्हावी. परंतु सहसा असे होताना दिसते.

नेहमीप्रमाणे दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वीही भारतीय संघाची पत्रकार परिषद झाली. परंतु या पत्रकार परिषदेत फक्त कसोटी संघाचा कर्णधार विराटच उपस्थित होता. त्याच्यासोबत संघ प्रशिक्षक द्रविड मात्र दिसले नाहीत. यानंतर त्यांच्या अनुपस्थितीवरून प्रश्न उभे होत आहेत. द्रविड यांच्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच परदेशी दौरा आहे. अशात ते संघाच्या रणनितीसह भारतीय क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या विवादांवर स्पष्टीकरण देतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही.

रोहितसोबत केलेली पत्रकार परिषद
काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात टी२० आणि कसोटी मालिका खेळली होती. या मालिकांमधूनच द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरू झाला होता. यावेळी टी२० संघाचा कर्णधार रोहितसोबत द्रविड हे पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते.

परंतु विराटसोबत ते पत्रकार परिषदेला न आल्याने द्रविड नक्की का लोकांपुढे येत नाहीयेत, भारतीय क्रिकेटमध्ये इतका गदारोळ माजला असताना ते इतके शांत का आहेत असे बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: महाराष्ट्राची गाठ आता तमिळनाडूशी

विराटला कर्णधारपदावरून हटवणे योग्य की अयोग्य? पाहा काय म्हणाले त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक

आता सचिनही करणार बीसीसीआयमध्ये एन्ट्री? गांगुली यांचे सूचक वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---