भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका शुक्रवारी (22 सप्टेंबर) सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या एयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे आकडे जबरदस्त राहिले आहेत. पण तरीही पहिल्या दोन सामन्यांसाठी त्यांना संघातून बाहेर बसवले गेले आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयामागचे कारण स्वतः मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वोत्तम प्रदर्शनाचा विचार केला, तर जगभरतील फलंदाजांमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. यादीत दुसरा क्रमांक रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत विराटने 1971, तर रोहितने 1830 धावा केल्या आहेत. यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा माजी कर्णधार ओयन मॉर्गन आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1678 वनडे धावा केल्या आहेत. 1230 वनडे धावांसह दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज जॅक कॅलिस यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. एमएस धोनी आणि शिखर धवन अनुक्रमे पाच आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. विराट आणि रोहित यादीत सर्वात वरती असले, तरीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी त्यांना विश्रांती दिली गेली आहे.
वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विपक्षीय मालिकेत सर्वोत्तम प्रदर्शन करणारे फलंदाज (इनिंग)
1971 – विराट कोहली (35)
1830 – रोहित शर्मा (30)
1678 – ओयन मॉर्गन (46)
1230 – जॅक कॅलिस (36)
1176 – एमएस धोनी (32)
1093 – शिखर धनव (25)
मालिका सुरू होण्यापूर्वी गुरुवारी (21 सप्टेंबर) भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याकडून रोहित आणि विराटला विश्रांती देण्याचे कारण स्पष्ट केले गेले. माध्यमांशी बोलताना द्रविड म्हणाले, “भारतीय संघाला रोहित आणि विराट हे दोघेही विश्वचषकासाठी शरीरिक आणि मानसिक पातळीवर फिट हवे आहेत. याच कारणास्तव त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये विश्रांती दिली गेली आहे.” दरम्यान, रोहित आणि विराटसह पहिल्या दोन सामन्यांमध्ये हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनाही विश्रांती दिली केली आहे. रोहितच्या अनुपस्थितमध्ये केएल राहुल संघासाठी कर्णधाराची भूमिका पार पाडेल. (Rahul Dravid explained the reason behind resting Rohit Sharma and Virat Kohli in the first two matches against Australia)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या –
काऊंटीत करून नायरचा धमाका, अवघ्या दुसऱ्याच सामन्यात ठोकलं दीडशतक
सुनील छेत्रीने जिंकलं 140 कोटी भारतीयांचं मन, Asian Games 2023मध्ये संघाला मिळवून दिला पहिला विजय