आशिया चषक २०२२ मध्ये भारतीय संघ चांगले प्रदर्शन करत आहे. आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने अनुक्रमे पाकिस्तान आणि हाँगकाँग यांना पराभूत केले. या दोन विजयानंतर भारतीय संघ सुपर फोरमध्ये पोहोचला आहे. सुपर फोरमधील पहिला सामना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याच्याकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराटकडून या सामन्यात काय अपेक्षा असेल, याविषयी माहिती दिली.
विराट कोहली (Virat Kohli) मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर भारताच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर तब्बल 70 शतकांची नोंद आहे, पण मागच्या जवळपास तीन वर्षांमध्ये त्याच्या बॅटमधून एकही शतक निघाले नाहीये. असे असले तरी, एक महिन्याच्या विश्रांतीचा त्याला फायदा झाल्याचे दिसते. इंग्लंड दौऱ्यातनंतर विराट थेट आशिया चषकात खेळत आहे. पुनरागमनानंतर त्याचा फॉर्म परतताना दिसत आहे. त्याने पकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 35 तर हाँगकाँगविरुद्ध खेळताना नाबाद 59 धावा ठोकल्या होत्या. आता सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना चाहते विराटकडून शतकाची अपेक्षा लावून बसले आहेत. पण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या मते विराटचे योगदान छोटे जरी असले, तरी हा सामना जिंकण्याठी ते महत्वाचे ठरेल.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी राहुल द्रविड माध्यामांशी चर्चा करत होते. ते म्हणाले की, “विराट आणि बाकीच्या खेळाडूंशी झालेली चर्चा मी सांगू शकत नाही. त्यांनी मागच्या सामन्यांमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले आहे. आनंद आहे की, विराटने खराब फॉर्मचे जाळे तोडले आहे. आता अपेक्षा आहे की, इथपासून पुढे त्याला नवीन आणि चांगली सुरुवत मिळेल.”
“विराट मोठी खेळी करण्यासाठी इच्छुक आहे. मला आनंद आहे की, त्याने चांगले प्रदर्शन केले देखील आहे. मागच्या सामन्यात तो ज्या पद्धतीने खेळला, ते खूपच अप्रतिम होते. तो एक महिन्याच्या ब्रेकनंतर पुनरागमन करत आहे. मी त्याच्यासाठीही खुश आहे. तो किती धावा करतो हे आमच्यासाठी महत्वाचे नाहीये. तो संघाची गरज आहे, त्यामुळेच त्याचे छोटेसे योगदान देखील गरजेचे आहे,” असेही द्रविड पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, आशिया चषकात भारत आणि पाकिस्तानध्ये खेळल्या केलेल्या पहिल्या सामन्यात भारताने 5 विकेट्स राखून विजय मिळवला होता. आता चाहत्यांना रविवारी (4 सप्टेंबर) पुन्हा एकदा या कट्टर प्रतिस्पर्धी राष्ट्रांमधील लढत पाहायला मिळेले. सुपर फोरमध्ये भारताला पाकिस्तानव्यतिरिक्त श्रीलंका आणि अफगाणिस्ता यांच्यासोबत अनुक्रमे 6 आणि 8 सप्टेंबर रोजी खेळायचे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्या आणि भारताच्या अन्य फलंदाजांना बाद करण्यासाठी पाकिस्तानने आखली स्ट्रॅटेजी, वाचा सविस्तर
आशिया चषकातील हाराकिरी जिव्हारी! बांगलादेशच्या स्टार यष्टीरक्षकाचा टी20 क्रिकेटला अलविदा
अल्टिमेट खो खो स्पर्धेत तेलगु योद्धाज व ओडिशा जगरनट्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत