भारताने 2021 वर्षाचा शेवट विजयाने केला. परंतु, 2022 ची सुरुवात पराभवाने झाली. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पार पडला. जोहान्सबर्ग येखे पार पडलेल्या या सामन्यात भारताला 7 गडी राखून पराभव केला. विशेष म्हणजे यापूर्वी भारतीय संघ जोहान्सबर्ग येथे कधीही पराभूत झाला नव्हता. या पराभवामागे मोठे कारण म्हणजे दोन्ही डावात भारताला मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यातच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने खराब शॉट खेळून आपली विकेट भेट दिली. त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. आता भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही संघ व्यवस्थापन पंतसोबत त्याच्या शॉट निवडीबाबत चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जोहान्सबर्ग कसोटीत भारतीय संघाने 163 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या आणि चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांचीही शतकी भागीदारी तुटली होती. अशावेळी भारताला चांगल्या भागीदारीची गरज होती. त्याचवेळी पंत नव्याने क्रीजवर आला होता. पण कागिसो रबाडाच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. त्याला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
पंतच्या कामगिरीबद्दल द्रविड सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, “आम्हाला माहित आहे की पंत सकारात्मक खेळतो आणि तो एका विशिष्ट पद्धतीने फलंदाजी करतो आणि त्यालाही अलीकडच्या काळात अशी फलंदाजी करून काही यश मिळाले आहे. पण हो, नक्कीच त्यांच्याशी बोलू. फक्त तो शॉट खेळण्याची वेळ आणि सामन्याची परिस्थिती यावर चर्चा केली जाईल.”
ते पुढे म्हणाले, “तुम्ही सकारात्मक किंवा आक्रमक खेळाडू बनू नका, असे पंतला कोणीही सांगणार नाही. पण कधी कधी असे करायला वेळ लागतो. माझा विश्वास आहे की, जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर नवीन असाल, तेव्हा थोडा वेळ घालवणे चांगले. पण शेवटी आम्हाला माहित आहे की पंतमुळे आम्हाला काय मिळत आहे – तो खरोखर सकारात्मक खेळाडू आहे. तो असा फलंदाज आहे जो आमच्यासाठी खूप लवकर खेळ फिरवू शकतो. त्यामुळे तुम्ही त्याचा नैसर्गिक खेळ सोडून पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने खेळण्यास सांगू शकत नाही. कधी-कधी फलंदाज म्हणून तुम्हाला विरोधी संघावर कधी आक्रमक व्हायचे असते, हे समजून घेणे आवश्यक असते.”
अधिक वाचा – Video: बाद झाल्यानंतर रिषभ पंतचे हरपले भान! पॅव्हेलियनमध्ये परतताना केले असे काही
तसेच द्रविड म्हणाला की पंत शिकत आहे आणि तो एका खास पद्धतीने खेळतो. त्यामुळे तो नेहमीच काहीतरी शिकत असतो. आशा आहे की, तो त्याच्या खेळात सुधारणा करत राहील आणि तो पूर्वीपेक्षा चांगला असेल.
व्हिडिओ पाहा – डकवर्थ लुईस नियमाला पर्याय ठरणारी भारतीय पद्धत
गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यापासून पंत धावा करण्यासाठी झगडत आहे. त्याने 13 डावात 250 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या 50 आहे. गेल्या 13 डावांत त्याला एक अर्धशतक झळकावता आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मँचेस्टर युनायटेडमध्ये खळबळ! एकाच वेळी तब्बल १७ प्रमुख खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत
मुंबईकरांसाठी खुशखबर! ‘या’ कारणामुळे बीसीसीआय आयपीएल २०२२ चे सर्व सामने मुंबईत खेळवण्याच्या विचारात
अजबच! चेंडू स्टम्पला लागला, अंपायरनेही आऊट दिले होते, तरीही स्टोक्सला मिळाले ‘असे’ जीवदान






