सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असण्याव्यतिरिक्त, राहुल द्रविड हा भारताने आतापर्यंत निर्माण केलेल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासमवेत भारताच्या ‘फॅब ५’ चा भाग होता, ज्यांनी टीम इंडियासाठी एक दशकाहून अधिक काळ मजबूत फलंदाजी केली.
तथापि, बहुतेक प्रसंगी द्रविड संघासाठी एक अनसंग हिरो होता. भारताच्या महान फलंदाजांपैकी एक असलेल्या द्रविडलाही कधीतरी दडपणाचा सामना करावा लागला होता. मात्र, प्रत्येक प्रसंगी द्रविडने शानदार पुनरागमन करत भरपूर धावा केल्या. जगातील सर्वात मोठे गोलंदाज त्याच्यासमोर झुंजताना दिसले.
मी कधीच सेहवागसारखा होऊ शकत नाही
राहुल द्रविड देखील असाच एक व्यक्ती होता ज्याला कोणत्याही सामन्यात संधी मिळाली नाही तर तो त्याच्या खेळाचा खूप विचार करायचा. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रासोबत त्याच्या पॉडकास्ट ‘इन द झोन’ वर बोलताना द्रविडने सांगितले की त्याला खेळातून मानसिक विश्रांती घेण्याचे महत्त्व कसे कळले.
तो म्हणाला की, “मी खूप ऊर्जा खर्च करायचो. मी खेळत नसतानाही माझ्या खेळाचा विचार करत होतो, त्यावर चिंतन करत होतो आणि विनाकारण काळजी करत होतो. कालांतराने मला कळले की ते खरोखर माझ्या खेळास मदत करत नाही किंवा मला चांगले खेळण्यास मदत करत नाही. यातून बाहेर पडण्यासाठी आणि क्रिकेटच्या बाहेरील जीवन जगण्यासाठी मला काहीतरी नवीन करण्याची गरज होती.
सेहवागसारख्या आनंदी व्यक्तिरेखेला खेळापासून दूर जाणे थोडे सोपे का वाटले, हेही द्रविडने सांगितले. द्रविड म्हणाला की, “मी वीरेंद्र सेहवागसारखा कधीच होणार नाही. एक उत्तम व्यक्तिमत्व असल्याने सेहवागने मैदान सोडताच स्वत:ला आराम देणे सोपे होते. मी त्या पातळीवर कधीच पोहोचणार नव्हतो, पण अर्थातच मी धोका ओळखला. मला माहित होते की मला विनाकारण चिंता करण्यापासून बाहेर पडण्याची गरज आहे. यासाठी मला मानसिक बाजू मजबूत करावी लागली.”
दरम्यान, द्रविड आणि अभिनव बिंद्रा यांच्या पॉडकास्टमध्ये द्रविडने अनेक विविध गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्ये त्याने क्रिकेट कारकिर्दीतील अनेक भन्नाट किस्सेही शेअर केले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बीसीसीआयला मिळाला नवा स्पॉन्सर! तब्बल इतक्या कोटींचा झाला करार
बंगाल क्रिकेट संघाला मिळाले नवे प्रशिक्षक; टीम इंडियाला पोहोचवलेलं वर्ल्डकपच्या फायनलमध्ये