विराट कोहलीच्या नेतृत्वातील प्रमुख भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. हा संघ इंग्लंडमध्ये असताना भारताचा आणखी एक संघ श्रीलंकेमध्ये मर्यादित षटकांच्या मालिका खेळेल. अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वातील या २० सदस्यीय संघाचे प्रशिक्षक म्हणून भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड भूमिका बजावेल. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी द्रविडने दिलेल्या मुलाखतीत या दौऱ्यावर खेळाडूंना कशाप्रकारे संधी देण्यात येईल याचा खुलासा केला.
मालिका जिंकणे महत्त्वाचे
सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक म्हणून भूमिका बजावणारा राहुल द्रविड प्रथमच राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळेल. श्रीलंका दौऱ्यावर त्याच्या हाताशी युवा संघ असणार आहे. या संघातील खेळाडूंना कितपत संधी मिळेल असा प्रश्न विचारला असता द्रविड म्हणाला, “पृथ्वी शॉसोबत देवदत्त पडिक्कल व ऋतुराज गायकवाड हे प्रतिभावंत युवा संघात आहेत. हे सर्व खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करू इच्छितात. आगामी टी२० विश्वचषकासाठी संघ निवडणे निवडसमितीचे काम आहे. आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध चांगली कामगिरी केल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल. ही मालिका या खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची असेल.”
द्रविड पुढे म्हणाला, “संघात आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. मात्र, आपण या दौऱ्यावर केवळ सहा सामने खेळणार आहोत. यामध्ये सर्वांना संधी देणे शक्य नाही. दोन्ही मालिका जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक म्हणून हा वेगळा अनुभव असेल. येथून मी स्वतः मध्ये प्रशिक्षक म्हणून सुधार करण्याचा प्रयत्न करेल.”
भारतीय संघ या दौऱ्यावर तीन वनडे व तीन टी२० सामने खेळणार आहे. हा दौरा १३ जुलैपासून सुरू होईल. सर्व सामने हे कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेथवेटच्या ४ षटकारांची स्टोक्सने केली सव्याज परतफेड, व्हिडिओ होतोय व्हायरल
आता रंगणार ग्रास कोर्टवरील थरार! मानाच्या विम्बल्डन ग्रँडस्लॅमसाठी टेनिसपटू सज्ज
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितसोबत सलामीसाठी गावसकरांचा ‘या’ फलंदाजाला पाठिंबा