रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड यांना भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेतून ते आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १७ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी राहुल द्रविड यांनी प्रत्येक स्वरूपासाठी वेगळा संघ निवडण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, “तुम्ही हे नाही म्हणू शकत की, १९ वर्षाखालील संघाचा प्रशिक्षक म्हणून म्हटलेली प्रत्येक गोष्ट मी इथे म्हणेल. मी ते मुळीच करणार नाही. माझ्याकडे काहीतरी शिकण्याची आणि खेळाडूंना जाणून घेण्याची संधी आहे. खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेणे ही सपोर्ट स्टाफ म्हणून तुमची जबाबदारी आहे. कनिष्ठ स्तरावर अंतिम ध्येय फक्त जिंकणे नसते. परंतु, वरिष्ठ स्तरावर संघाने प्रत्येक सामना जिंकणे अपेक्षित असते.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “संघात संतुलन असणे आवश्यक आहे. आमचे लक्ष्य एकच आहे, आम्हाला प्रत्येक सामन्यात विजय मिळवायचा आहे. हे बायो बबलमध्ये जगण्याचा थकवा आणि वर्तमान परिस्थितीवर देखील लागू होते. आम्ही खेळाडूंच्या भविष्याचा आणि दीर्घकालीन कारकिर्दीचा विचार करू, परंतु अल्पकालीन ध्येयांसाठी, त्यांच्या चांगुलपणाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.”
वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल बोलताना राहुल द्रविड म्हणाले की, “आता सध्या जिंकायचं आहे आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या मोठ्या सामन्याची देखील तयारी करायची आहे. भविष्याचा विचार करणे हे माझे काम आहे. ते प्रत्येक संघासाठी सारखेच असेल. वेगवेगळ्या प्रकारासाठी वेगवेगळा संघ याबाबत कुठलाही विचार केला जात नाहीये. परंतु, सर्व प्रकार खेळणाऱ्या खेळाडूंना योग्य विश्रांती दिली जाईल.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘हे एक मोठे आव्हान’, वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मोठे वक्तव्य
काय सांगता! ९ वर्षांपुर्वीच रोहितने जयपुरमधेच कर्णधार होण्याच केलं होतं भाष्य, पाहा व्हायरल पोस्ट






