भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) आहे. या दौऱ्यात भारताला तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल (mayank agarwal) याने सध्या संघात चांगल्या प्रकारे पुनरागमन केले आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अगरवालने कन्कशनच्या (डोक्याला दुखापत) कारणास्तव मालिकेतून माघार घेतली होती. या दरम्याच्या काळात त्याने मानसिक गोष्टींवर काम केल्याचे मयंक म्हणाला आहे.
मयंक अगरवालने न्यूझीलंडविरुद्ध अलिकडेच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कसोटी मालिकेत जोरदार पुनरागमन केले होते. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने १५० आणि ६२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यातही त्याला संघात सामील केले गेले. मयंकने केएल राहुलसोबत बीसीसीआय टीव्हीसाठी खा चर्चा केली.
राहुलसोबत चर्चा करताना मयंक म्हणाला की, “ही नवीन सुरुवात नाहीय. एक वर्षा मी स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि हे जाणून घेणाचाही की, माझी ताकत आणि कमजोरी काय आहे. मला पुनरागमन करून चांगले प्रदर्शन करू शकल्याचा आनंद आहे आणि पुढेही या फॉर्मला कायम ठेवेल.”
भारतीय संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खेळाडूंना नेहमी आत्मपरीक्षण करण्याविषयी सल्ला देत असतात. अशात स्वतःला समजून घेण्यासाठी द्रविडचे काय योगदान राहिले यावर मयंक म्हणाला, “ते नेहमी स्वतःला समजून घेण्याविषयी आणि मानसिक गोष्टींवर काम करण्याविषयी बोलत असतात. याच्यावर काम केल्यामुळे यश मिळवण्याच्या संधी वाढतात. ते चांगल्या तयारीवर देखील लक्ष देतात. आम्ही याठिकाणी चांगला सराव केला आहे आणि कसोटी सामन्याची वाट पाहत आहोत.”
दरम्यान, भारताला या दौऱ्यात सुरुवातीला कसोटी मालिका खेळायची आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सेंचुरीयनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कमध्येे खेळला जाईल. त्यानंतर दुसरा कसोटी सामना ३ जानेवारीला आणि तिसरा कसोटी सामना ११ जानेवारीला सुरू होईल. कसोटी मालिकेनंतर उभय संघातील एकदिवसीय मालिका १९ जानेवारीपासून खेळली जाईल.
महत्वाच्या बातम्या –
ईएमएमटीसी १४ वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत तनुष, अर्णव, हर्षिनी, सोहनी अंतिम फेरीत
ट्रूस्पेस पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून २७५ खेळाडू सहभागी
हरभजनच्या निवृत्तीनंतर पत्नीची भावनिक पोस्ट; म्हणाली, ‘त्याला अशी निवृत्ती नको होती, पण..’
व्हिडिओ पाहा –