टी-20 विश्वचषकात रविवारी (6 नोव्हेंबर) भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात भारताने 71 धावांचा मोठा विजय मिळवला असून संघाला आता इंग्लंडसोबत स्पर्धेचा उपांत्य सामना खेळायचा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा उपांत्य सामन्यात 10 नोव्हेंबर रोजी एडिलेडमध्ये खेळला जाणार आहे. उपांत्य सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ शक्य ते सर्व प्रयत्न करेल. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये एक खास बदल होणार असल्याचेही संकेत दिले आहेत.
भारताला इंग्लंडसोबतचा उपांत्य सामना गुरुवारी (10 नोव्हेंबर) एडिलेडच्या ओव्हल मैदानावर खेळायचा आहे, ज्याठिकाणची खेळपट्टी संथ गतीच्या गोलंदाजांना अधिक फायदेशीर ठरल्याचे दिसले आहे. भारताने याआधी याठिकाणी बांगलादेशविरुद्धचा सामना खेळला होता आणि आणि 5 धावांनी विजय देखील मिळवला होता. संघाला याठिकाणी खेळण्याचा अनुभव अल्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) प्लेइंग इलेव्हनमध्ये एक महत्वाचा बदल करण्याच्या तयारीत दिसत आहेत. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यावर्षीच्या विश्वचषकात अजून एकही सामना खेळला नाहीये. पण उपांत्य सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकते.
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मते मैदाताली परिस्थिती आणि खेळपट्टी पाहून प्लेइंग इलेव्हन निवडली जाईल. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर द्रविड माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संघाच्या प्लेइंग इलेव्हनविषयी देखील महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “मला वाटते आमच्याकडे असलेल्या सर्व 15 खेळाडूंसाठी आम्ही समान विचार करतो. आमच्या मते जो कोणी या 15 सदस्यांमध्ये आहे, तो संघाला कमजोर बनवणार नाही. ज्या पद्धतीचा संघ आम्ही बनवला आहे, त्यावरून तरी असेच दिसते.”
“मी पुन्हा सांगतो की, आम्हाला त्याठिकाणी जावून पाहावे लागेल. मी आज काही सामने पाहिले (एडिलेडमध्ये) आणि मला माहिती आहे की, खेळपट्टी संथ आहे. ही खेळपट्टी चेंडूला पकडून ठेवणार आहे आणि थोडा टर्न देखील मिळणार आहे. आम्ही एडिलेडमध्ये पूर्णपणे नवीन खेळपट्टीवर खेळत आहोत. इमानदारने सांगायचे तर बांगलादेशविरुद्ध आम्ही ज्या खेळपट्टीवर खेळलो, त्याठिकाणी चेंडू स्पिन झाला होता. ती एक वेगळ्याच पद्धचीची खेळपट्टी होती. एडिलेडमध्ये अशीच खेळपट्टी पाहिली गेली आहे,” असे द्रविड पुढे बोलताना म्हणाले. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) देखील इंग्लंडविरुद्ध खेळताना दिसू शकतो. कार्तिकच्या जागेवर झिम्बाब्वेविरुद्ध रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. पण त्याने अवघ्या तीन धावा करून विकेट गमावली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकेवेळी पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानचा कर्णधार म्हणतोय, ‘आता आम्हाला चढलाय जोश’
पुन्हा रंगणार भारत विरूद्ध पाकिस्तान थरार? एकाच क्लिकवर जाणून घ्या सेमी फायनलची समीकरणे