---Advertisement---

राहुल द्रविडच्या अडचणी वाढणार! भारतीय दिग्गजाचे प्रशिक्षक बदलण्याविषयी वक्तव्य

On: बुधवार, नोव्हेंबर 23, 2022 11:52 PM
Rahul Dravid
---Advertisement---

मागच्या वर्षी टी-20 विश्वचषक संपल्यानंतर रवी शास्त्री भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार झाले. संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड सध्या चांगल्या पद्धतीने ही भूमिका पार पाडत आहेत. परंतु माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याच्या मते टी-20 प्रकारात भारतीय संघाला एक नवीन प्रशिक्षकाची गरज आहे. हरभजनने एका माजी दिग्गज गोलंदाजाचे नाव देखील सुचवले, जो टी-20 क्रिकेटमध्ये संघासाठी फायदेशीर ठरू शकतो. 

आशीष नेहरा (Ashish Nehra) आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला. गुजरात संघासाठी हे त्यांचे आयपीएल पदार्पण होते आणि नेहराच्या मार्गदर्शनात त्यांना आयपीएल ट्रॉफी देखील जिंकली. नेहरा मोठ्या काळापर्यंत टी-20 क्रिकेट केळला आहे आणि त्याचा हा अनुभव नक्कीच भारतीय टी-20 सांघाच्या कामी येऊ शकतो. हरभजन सिंग (Harbhajan Singh) याच्या मते भारताला टी-20 फॉरमॅटमध्ये नेहरासारख्या प्रशिक्षकाची गरज आहे. नेहराने 2017 मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता.

हरभजन सिंग माध्यमांशी बोलताना म्हणाला, “टी20 प्रकारात आपल्याकडे आशीष नेहरासारका एखादा व्यक्ती असला पाहिजे. नेहराने अगदी अलिकडच्या काळात खेळातून निवृत्ती घेतली आहे. त्याला या प्रकाराची चांगली जाण आहे. मी राहुल द्रविडसोबत मोठ्या काळापासून खेळत आलो आहे. त्याच्याप्रती मला सन्मान आहे. खेळाविषयी त्याला असलेल्या अनुभवावर मी प्रश्न उपस्थित करत नाहीये. पण हा फॉरमॅट थोटा वेगळा आणि अवघड आहे.”

हरभजनच्या मते जो व्यक्ती टी-20 प्रकारात अलिकडच्या काळात खेळला आहे, तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत चांगली कामगिरी करू शकतो. याविषयी बोलताना हरभजन म्हणाला की, “ज्यांनी अलिकडच्या काळात या प्रकरात प्रदर्शन केले आहे, तो टी-20 मध्ये प्रशिक्षकाच्या कामासाठी चांगला पर्याय आहे. मी असे म्हणत नाहीये की, राहुल द्रविडला टी-20मधून काढून टाकले पाहिजे. आशीष नेहरा आणि राहुल द्रविड दोघे मिळून संघ बनवण्यासाठी काम करू शकतात.”

टी-20 विश्वचषकात इंग्लंड संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात वेगवेगळे प्रशिक्षक निवडण्याच्या चर्चा जोर धरत आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना हरभजन म्हणाला की, “अशा व्यवस्थेमुळे (वेगवेगळे प्रशिक्षक) राहुलसाठी विश्रांती घेणे सोपे होईल आणि त्याच्या अनुपस्थितीत नेहरा संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका सांभाळू शकतो.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘खूपच शानदार पोरांनो’, निवड समिती बरखास्त झाल्यानंतर चेतन शर्मांचे ट्वीट, बीसीसीआयवर साधला निशाणा
भारतीय दिग्गज म्हणतोय, “कसोटीसाठी सूर्याचा बळी देऊ नका”  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---