भारत आणि न्यूझीलंड संघात टी२० आणि कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेआधी भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. नियमित प्रशिक्षक बनल्यानंतर द्रविडच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडविरुद्धची आगामी टी२० मालिका ही भारताची पहिली मालिका असेल.
न्यूझीलंड संघ भारत दौर्यावर येणार असून तीन टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. तरुण खेळाडूंना तयार करण्यात राहुल द्रविडने याआधी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने आधी भारत-अ संघाचे प्रशिक्षकपद आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद देखील सांभाळले होते.
आपल्या कारकिर्दीत ५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या राहुल द्रविडकडे आता महत्त्वाची जबाबदारी आली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करते हे पाहणे रंजक ठरेल. यासाठी राहुल द्रविडने अनोख्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे.
राहुल द्रविड तरुणांशी उत्तम संवाद साधतो आणि याची अनेक उदाहरणे आहेत. आता त्याला मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आल्याने त्याने सर्व खेळाडूंशी वैयक्तिक संवाद साधला आणि आगामी मालिकेत योग्यवेळी संधी दिली जाईल, असे आश्वासनही दिले. बीसीसीआयने शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. एका माहितीनुसार, द्रविडने खेळाडूंशी वयक्तिक संवाद साधला आहे. त्याने सर्वांना बोलावले आणि सर्वांशी एकांतात आपुलकीने संवाद साधला.
द्रविडने प्रत्येक खेळाडूला स्वतंत्रपणे बोलावले त्यांच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल विचारले. इतकेच नाही तर द्रविडने तंदुरुस्त वाटत नसल्यास आणि आवश्यक असल्यास विश्रांती घेण्याचेही सांगितले. सर्वांशी संवाद साधताना द्रविडने भारतीय संघात स्थान मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.
तो म्हणाला की, युवा खेळाडू चांगली कामगिरी करतात किंवा वरिष्ठ खेळाडू अधिक चांगली कामगिरी करतात, प्रत्येक खेळाडूला संधी दिली जाईल. तसेच स्वतःबद्दल आणि भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक खेळाडूकडून तुम्हला काय अपेक्षा आहेत याबद्दलही याने खेळाडूंशी थोडक्यात संवाद साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केनचा आणखी एक कारनामा! लाजवाब अर्धशतकासह बनविला नवा इतिहास
भारत-न्यूझीलंड मालिका सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारची क्रिकेट चाहत्यांना मोठी भेट