---Advertisement---

सूर्यकुमार यादव की राहुल तेवतिया, कोण खेळणार भारतीय संघात?

---Advertisement---

आपणा सर्वांना माहिती आहे की, प्रतिष्ठित अशा इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनुभवी खेळाडूंसह बरेच युवा खेळाडूही खेळतात. कित्येक खेळाडूंना तर त्यांच्या आयपीएलमधील अतुलनीय प्रदर्शनानंतर त्यांच्या देशाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळते. सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात कमालीचे प्रदर्शन करत असलेल्या राहुल तेवतिया आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंपैकी एकाला भारतीय संघात स्थान मिळण्याची चर्चा होत आहे.

पण संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये चालू असलेल्या आयपीएल २०२०मध्ये राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू तेवतिया आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यांच्याव्यतिरिक्त बरेच युवा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. मग या दोघांनाच भारतीय संघात का स्थान दिले जाईल?, हा प्रश्न सर्वांना पडला असेल.

माजी भारतीय रणजीपटू संजीव कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “कोविड-१९ पुर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींसोबत मी भारतीय टी२० विश्वचषक संघात नव्या खेळाडूंना संधी मिळेल का नाही, या विषयावर चर्चा केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, आम्ही आयपीएल २०२०ची वाट पाहू आणि त्यावरुन पुढील निर्णय घेतला जाईल. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळण्याच्या अपेक्षा आहेत.”

“माझ्यामते, सूर्यकुमारला संधी मिळण्याच्या जास्त शक्यता आहे. कारण या ३० वर्षीय खेळाडूला बराच अनुभव आहे. तसेच त्याची प्रथम श्रेणी, अ दर्जाचे क्रिकेट आणि देशांतर्गत टी२० क्रिकेटमधील आकडेवारी उल्लेखनीय आहे. त्याची टी२० क्रिकेटमधील सरासरी ३१पेक्षा जास्त आहे. तसेच त्याने टी२०त १७ अर्धशतकेही केली आहे. तर दूसऱ्या बाजूला तेवतिया २७ वर्षांचा झाला असला तरी, त्याला जास्त अनुभव नाही. पण त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारी चांगली आहे,” असे पुढे बोलताना संजीव म्हणाले.

तसेच शेवटी बोलताना ते म्हणाले की, “सूर्यकुमार आणि तेवतिया यांना भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी पूर्ण हंगामात चांगले खेळावे लागेल. फक्त २-३ सामन्यांत चांगली खेळी केल्याने त्यांना संधी मिळेल, असे म्हणता येणार नाही.”

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्या’ पुरस्कारासाठी तेवतियाला तब्बल ६ वर्ष पाहावी लागली वाट

दिल्ली संघाला मोठा झटका, अमित मिश्रानंतर ‘हा’ खेळाडू आयपीएलमधून बाहेर

‘तुम्ही धोनीला ‘ही’ असली वागणूक देताय?’ पाकिस्तानचा आफ्रिदी भडकला

ट्रेंडिंग लेख-

“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक

विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म

सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन का आहे इतका खास?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---