-अनिल भोईर
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि श्री गणेश क्लब बोकडविरा याच्या संयुक्त विद्यमाने ६६ व्या वरीष्ठ गट (पुरुष व महिला) रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक १९ ऑक्टोबर ते बुधवार दिनांक २१ ऑक्टोबर २०१८ दरम्यान या स्पर्धेचे सामने होणार आहेत. पहिल्या दिवशी १९ ऑक्टोबर रोजी महिला गटाचे सामने खेळवण्यात येतील. तर पुरुषाचे सामने तिन्ही दिवस होतील.
प्रो कबड्डीमूळे या खेळाला गतवैभव प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्हात वर्षभरात सर्वाधिक जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा खेळवल्या जातात. त्यामुळे स्पर्धेत कबड्डीचा थरार पाहायला मिळणार आहे.
कुठे व कधी होणार ही स्पर्धा ?
बोकडविरा पेट्रोल पंपा शेजारी, बोकडविरा ता. उरण रायगड येथे १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धा मातीच्या मैदानावर खेळवली जाईल.
किती संघ होणार सहभागी ?
पुरुषांचे जवळपास २५६ संघ तर महिलांचे ३२ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
कोण आहे आयोजक ?
रायगड जिल्हा कबड्डी असोशियशन व श्री गणेश क्लब बोकडविरा, उरण (गणेशपूर) याच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
निवड चाचणी स्पर्धेतून काय हाती लागणार ?
रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेतून संभाव्य २० खेळाडूंची निवड केली जाणार आहेत. त्यानंतर प्रशिक्षण शिबीरानंतर पुरुषांच्या आणि महिलांच्या अंतिम १२ खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. हा संघ ३१ ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर २०१८ या दरम्यान सिन्नर, नाशिक येथे होणाऱ्या ६६ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.
महत्वाच्या बातम्या-
–तिसऱ्या दिवशी हैद्राबाद कसोटी जिंकत भारताचा विंडिजला व्हाईटवॉश
–२१ व्या शतकात अशी कामगिरी करणारा उमेश यादव पहिला भारतील गोलंदाज
–उत्तम फलंदाज असला तरी कोहलीला कर्णधार म्हणून अजून सिद्ध करायचे आहे…