क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये रेलीगेशन फेरीतून दोन संघ प्ले-ऑफस साठी पात्र झाले. रायगड मराठा मार्वेल्स व पालघर काझीरंगा रहिनोस संघांनी पाच विजय मिळवत प्ले-ऑफस साठी आपले स्थान निश्चित केले. दोन्ही संघ प्ले-ऑफस साठी पात्र ठरल्याने उर्वरित सहा संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
पालघर काझीरंगा रहिनोस विरुद्ध रत्नागिरी अरावली ॲरोज यांच्यात झालेली लढत पालघर संघाने 48-29 असा जिंकत पाचवा विजय मिळवला. या विजयासह पालघर संघाने प्ले-ऑफस साठी जागा निश्चित केली. पालघर कडून राहुल सवर ने 13 गुण तर राज साळुंखे ने 12 गुण मिळवले. तर हर्ष मेहेर व सर्वेश फटकारे ने प्रत्येकी 3 पकडी केल्या. धुळे चोला वीरांस संघाला नमवत रायगड मराठा मार्वेल्स संघाने प्ले-ऑफस साठी आपले स्थान निश्चित केले. रायगड संघाने 45-23 असा सामना जिंकला. रायगड कडून प्रशांत जाधव ने चढाईत 17 गुण तर अजय मोरे ने पकडीत 7 गुण मिळवले.
सांगली सिंध सोनिक्स संघाने परभणी पांचाला प्राईड संघाला 55-28 अशी मात देत तिसरा विजय मिळवला. सांगलीच्या वृषभ साळुंखे ने बदली खेळाडू येत जोरदार प्रदर्शन केले. वृषभ ने 3 बोनस गुणांसह एकूण 22 गुण मिळवले. तर प्रणव माने जबरदस्त 8 पकडी करत सामना एकतर्फी केला. नंदुरबार हिमालयन ताहर्स संघाने लातूर विजयनगारा विर्स संघावर 49-25 अशी मात विजय संपादन केला. नंदुरबार कडून संचित शिंदे मे चढाईत 11 तर तेजस काळभोर ने 10 गुण मिळवले. तर जयंत काळे ने 6 गुण मिळवत उत्कृष्ट बचाव केला. (Raigad Maratha Marvels, Palghar Kaziranga Rhinos in play-offs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धसमुसळ्या फलंदाजीने राजस्थानचा पराभव! लखनऊचा 155 धावांचा बचाव करत 10 धावांनी विजय
धक्कादायक! दोन महिन्यांपूर्वीच पदार्पण केलेल्या खेळाडूची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती, ठोकलेले एकमेव सामन्यात शतक