रायगड मराठा मार्वेल्स विरुद्ध रत्नागिरी अरावली ॲरोज यांच्यात रेलीगेशन फेरीचा सामना झाला. सामना जिंकून रेलीगेशन फेरीत अव्वल राहण्यासाठी रायगड संघ प्रयत्न करणार होता. तर रत्नागिरी साठी स्पर्धेतील शेवटचा असल्याने तो जिंकून शेवट गोड करायचं निर्धार होता. रायगड संघाच्या रुतिक पाटील ने चपळ चढाया करत गुण मिळवले. रुतिक पाटीलच्या आक्रमक खेळीने रायगड संघाने रत्नागिरी संघावर लोन पडत आघाडी मिळवली.
मध्यंतराला रायगड संघाकडे 24-08 अशी आघाडी होती. रुतिक पाटील ने आपला सुपर टेन पूर्ण केला. ते विराज पाटील व जयेश गावंड हे चांगल्याप्रकारे बचावफळी सांभाळत होते. शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना 44-23 अशी मजबूत आघाडी रायगड संघाकडे होती. रायगड संघाने 56-24 असा विजय मिळवत रेलीगेशन मध्ये अव्वल स्थान पटकावले.
रायगड संघाकडून रुतिक पाटील ने 22 गुण मिळवले. करण भगत ने अष्टपैलू खेळ करत 8 गुण मिळवले. तर विराज पाटील ने 4 व जयेश गावंड ने 5 उत्कृष्ट पकडी करत सामना एकतर्फी केला. रत्नागिरी कडून पारस पाटील ने सर्वाधिक 14 गुण प्राप्त केले. (Raigad Maratha Marvels top team in relegation round)
बेस्ट रेडर- रुतिक पाटील, रायगड मराठा मार्वेल्स
बेस्ट डिफेंडर्स- जयेश गावंड, रायगड मराठा मार्वेल्स
कबड्डी का कमाल- जयेश गावंड, रायगड मराठा मार्वेल्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सांगली सिंध सोनिक्स संघाची विजयासह सांगता
परभणी पांचाला प्राईड संघाचा स्पर्धेत विजयाने शेवट