पुणे । हेमंत पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन व भारत अगेंस्ट करप्शनच्या सहयोगाने आयोजित हेमंत पाटील महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत रायगड रॉकर्स संघाने सिंहगड स्टार्स संघाचा तर शिवनेरी पँथर्स संंघाने एच.पी सुपर किंग्स संघाचा पराभव करत स्पर्धेच आगेकुच केली.
व्हिजन क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत साखळी सामन्यात उत्कर्षा पवार व पार्वती बकाले यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर रायगड रॉकर्स संघाने सिंहगड स्टार्स संघाचा 4 धावांनी पराभव केला.
पहिल्यांदा खेळताना रायगड रॉकर्स संघाने 20 षटकात 3 बाद 156 धावा केल्या यात उत्कर्षा पवारने 52 चेंडूत नाबाद 58 तर पार्वती बकालेने 33 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या. 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सारिका कोळीच्या 80 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत व आरती केदारच्या अचूक गोलंदाजीपुढे सिंहगड स्टार्स संघ19.4 षटकात सर्वबाद 152 धावांत गारद झाला. 10 धावांत 5 गडी बाद करणारी आरती केदार सामनावीर ठरली.
दुस-या लढतीत किरण नवगीरेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शिवनेरी पँथर्स संघाने एच.पी सुपर किंग्स संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना प्रियांका घोडकेच्या 40 धावांसह एच.पी सुपर किंग्स संघाने 20 षटकात 4 बाद 110 धावा केल्या. 110 धावांचे लक्ष गौतमी नाईकच्या 42 व किरण नवगीरेच्या नाबाद 26 धावांसह शिवनेरी पँथर्स संघाने 18.3 षटकात 5 बाद 111 धावांसह पुर्ण करत विजय मिळवला. किरण नवगीरे सामनावीर ठरली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
रायगड रॉकर्स- 20 षटकात 3 बाद 156 धावा(उत्कर्षा पवार नाबाद 58(52), पार्वती बकाले नाबाद 56(33), श्रावणी देसाई 25, मनाली जाधव 2-24, सारिका कोळी 1-31) वि.वि सिंहगड स्टार्स- 19.4 षटकात सर्वबाद 152 धावा(सारिका कोळी 80(50), संजना शिंदे नाबाद 24, आरती केदार 5-10, सोनाली शिंदे 2-39, शिवानी भुकटे 1-48) सामनावीर- आरती केदार
रायगड रॉकर्स संघाने 4 धावांनी सामना जिंकला.
एच.पी सुपर किंग्स- 20 षटकात 4 बाद 110 धावा(प्रियांका घोडके 40(35), सई पुरंदरे 29(44), तेजश्री ननावरे नाबाद 18(15), सायली लोणकर 1-11, किरण नवगीरे 1-19, भुमिका उंबरजे 1-12) पराभूत वि शिवनेरी पँथर्स- 18.3 षटकात 5 बाद 111 धावा(किरण नवगीरे नाबाद 26(52), गौतमी नाईक 42(51), प्रियांका घोडके 2-21, प्रिया सिंग 1-4, तेजश्री ननावरे 1-23) सामनावीर- किरण नवगीरे
शिवनेरी पँथर्स संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
-तो स्क्रिनशाॅट पाहिल्यावर नक्की काय करावे सुचत नव्हते- राशिद खान
–ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज
–चेतेश्वर पुजाराने इंग्लंड गाजवले, वनडेत पुन्हा एक तुफानी फटकेबाजी
–त्याची आयपीएलमधील एक विकेट गेली ३० लाख रुपयांना!
-विजेतेपदामुळे धोनीचा चाहत्यांकडून दुर्लक्षित झालेला क्रिकेट इतिहासातील मोठा विक्रम!