---Advertisement---

IND vs NZ Final: एकाच डावात 18 षटकार आणि 19 चौकार! टीम इंडियाने फायनलमध्ये रचला नवा ऐतिहासिक विक्रम

On: रविवार, मार्च 8, 2026 10:27 PM
---Advertisement---

रविवार, 8 मार्च 2026 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या फायनलमध्ये भारतीय संघाने 5 गडी राखून 255 धावा केल्या. भारताच्या या डावात एकूण 37 बाउंड्री (18 षटकार आणि 19 चौकार) पाहायला मिळाल्या. टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सर्वाधिक बाउंड्री मारण्याचा हा एक नवा विक्रम आहे. टी-20 वर्ल्ड कप इतिहासात एकाच डावात सर्वाधिक बाउंड्री मारण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे, त्यांनी 2007 मध्ये केन्याविरुद्ध 41 बाउंड्री मारल्या होत्या, पण तो ग्रुप स्टेजचा सामना होता. दुसरीकडे, भारतीय संघाने 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येच इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये 37 बाउंड्री मारल्या होत्या, तर त्याच सामन्यात इंग्लंडने भारताच्या विरुद्ध 36 बाउंड्री ठोकल्या होत्या.

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मारलेल्या सर्वाधिक षटकारांचाही हा एक विक्रम आहे. यापूर्वी ग्रुप स्टेजच्या सामन्यांमध्ये 2014 मध्ये नेदरलँड्सने आयर्लंडविरुद्ध, तर 2026 मध्ये वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेविरुद्ध एकाच डावात 19-19 षटकार मारले होते. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये 19 षटकार मारले आहेत, परंतु फायनलसारख्या निर्णायक सामन्यात भारतापूर्वी कोणत्याही संघाने 18 षटकार मारले नव्हते.

अहमदाबादमध्ये टॉस गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला अभिषेक शर्मा (Abhishek Sharma and Sanju Samson) आणि संजू सॅमसन या जोडीने 7.1 षटकांत 98 धावांची झंझावाती भागीदारी करून शानदार सुरुवात करून दिली. अभिषेक 21 चेंडूत 9 बाउंड्रीसह 52 धावा करून बाद झाला, त्यानंतर संजूने ईशान किशनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूत 105 धावा जोडल्या आणि भारताला 200 धावांच्या पार नेले.

सॅमसनने 46 चेंडूत 8 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 89 धावांची खेळी केली, तर ईशानने 25 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 54 धावांची खेळी साकारली. शेवटच्या षटकांमध्ये शिवम दुबेने 8 चेंडूत 5 बाउंड्रीच्या मदतीने नाबाद 26 धावा केल्या आणि भारताला 255/5 या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. न्यूझीलंडकडून जेम्स नीशमने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर मॅट हेन्री आणि रचिन रवींद्रने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---