---Advertisement---

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुलगा अमितमध्ये रंगला टेनिसचा सामना

---Advertisement---

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांच्यात दोन दिवसांआधी शिवाजी पार्क जिमखाना येथे एक टेनिस सामना रंगला होता. गेल्या महिना भरापासून राज ठाकरे टेनिस खेळत आहेत परंतु त्यांच्या समवेत त्यांच्या विरोधात अमित ठाकरे उतरल्याने हा सामना चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी गेल्या महिन्यापासून शिवाजी पार्क जिमखाना येथील टेनिस कोर्टवर राज ठाकरे हे नियमितपणे टेनिस खेळताना दिसत आहे. यासाठी त्यांनी एक प्रशिक्षक देखील नेमला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील त्यांच्या सोबत परंतु त्यांच्या विरोधात खेळले होते. तब्बल दोन तासांच्या पिता पुत्रां मध्ये झालेल्या या लढतीत बाजी कुणी मारली ? हे उत्तर मात्र अद्यापही कुणाला मिळू शकलेले नाही.

राज ठाकरेंना झाला होता ‘टेनिस एल्बो’
मागील वर्षी राज ठाकरेंच्या हाताला ‘टेनिस एल्बो’ हा आजार झाला होता. यामुळे त्यांच्या हाताला सतत एक बेंडेज दिसत होते. राज ठाकरेंनी या आजारावर मुंबईत उपचार करून घेतले व आता ते टेनिस खेळताना दिसत आहेत.

वाचा-

-भारतीय टेनिसपटू दिविज आणि रोहन बोपन्ना अस्टाना ओपनमधून बाहेर

-व्हिएना ओपनचे विजेतेपद जिंकत रुबलेव्हने केला ‘हा’ मोठा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---