पुणे। बिलियर्डस अँड स्नूकर राज्य संघटनेच्या (बीएसएएम) अध्यक्षपदी पुण्याच्या राजन खिंवरसरा यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. मुंबईत १२ मार्च रोजी पार्क क्लब येथे झालेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ही निवडणूक पार पडली. श्री खिंवससा २०२१-२०२३ अशा आणखी एक टर्मसाठी अध्यक्षपद सांभाळतील.
श्री सौमिल कारकेरा आणि श्री मानव पांचाळ (उपाध्यक्ष); श्री अमित सप्रू (जेटी सचिव); श्री शेखर सुर्वे (खजिनदार) श्री प्रणव चिखल, श्री विशाल मदन, श्री आदित्य देशपांडे, श्री राजवर्धन जोशी, श्री विशाल गेहानी आणि श्री मौलिक मर्चंट (व्यवस्थापकीय समिती) अन्य सदस्य या बैठकीत निवडण्यात आले.
श्री. खिंवसरा हे भारतीय बिलियर्डस आणि स्नूकर महासंघाचेही अध्यक्ष आहेत. खिंवसरा हे २००६ ते २०२० या कालावधीत देशभारता झालेल्या विविध १३ राष्ट्रीय स्पर्धांचे मुख्य पुरस्कर्ते होते. भारतात झालेल्या दोन आशियाई आणि सहा विश्वचषक स्पर्धांचे देखिल ते प्रायोजक होते.
लहान शहरे आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त क्षमता वापरण्यासाठी आणि नवीन खेळाडू/प्रतिभा समोर आणण्यासाठी त्यांनी पॅन इंडिया स्तरावर क्यू स्पोर्ट्सच्या मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी नेहमीच भर दिला.त्याचबरोबर या खेळाला योग्य प्रसिद्धी मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले. भारतीय खेळातील स्थान आणि या खेळाचा आमच्या शालेय अभ्यासक्रमात आणि ऑलिम्पिकमध्ये समावेश केला जाण्याची इच्छा आहे. कोरोना महामारी आणि प्रचलित कोविड निर्बंध आणि मर्यादा पाळून 2021मध्ये भारताच्या क्यू-स्पोर्ट्स “88 वी बिलियर्ड्स आणि स्नूकर नॅशनल आणि 10 वी 6 रेड स्नूकर” यशस्वीपणे आयोजित केली. देशभरात ओमिक्रॉनच्या वाढीच्या अगदी आधी म्हणजे 24 नोव्हेंबर 2021 ते 29 डिसेंबर 2021 पर्यंत भोपाळमध्ये 36 दिवसांची अजिंक्यपद स्पर्धा यशस्वी पाडली. आजपर्यंत ज्या इर्षेने काम केले तसेच आणि तितक्याच आवेशाने आणि जिद्दीने यापुढेही काम करत राहू. खेळाची ही गती अशीचअबाधित राहील याची काळजी घेऊ, असे श्री. खिंवसरा म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
पीवायसी रिबाउंड रॅकेट लीग २०२२ स्पर्धेत तलवार्स व मस्किटर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत
‘पंत’ बनले मालिकावीर! ‘या’ कारणांमुळे श्रेयस आणि बुमराह ऐवजी रिषभ पंत ठरला मालिकावीर
पूना क्लब प्रीमियर लीग: वॉरियर्स संघाने पटकावले विजेतेपद