अहमदाबाद | इंडियन प्रीमियर लीग २०२२चा दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये रंगला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानने बेंगलोरचा ७ विकेट्सने पराभव केला. दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या राजस्थान संघाच्या खेळाडूंनी हॉटेलवर पोहोचताच विजयाचा आनंद चांगलाच साजरा केला. याचा व्हिडिओ राजस्थानच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर संघाने शेयर केल्याने तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये संघातील खेळाडू हॉटेलवर परतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते. खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक स्टाफ कुमार संगकारा आणि लसिथ मलिंगा यांनीही हा विजय साजरा केला.
𝑷𝒂𝒅𝒉𝒂𝒓𝒐. 🏨💗 pic.twitter.com/37uqOuC0MP
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 27, 2022
राजस्थानचा संघ रविवारी (२९ मे) होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाला टक्कर देणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार असून त्याला सांयकाळी आठ वाजता सुरूवात होणार आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात संघाचा हा पदार्पणाचा आयपीएल हंगाम आहे. पहिल्याच हंगामात अंतिम फेरीत विजेतेपद मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे, तर दुसरीकडे राजस्थानचा संघ तब्बल १४ वर्षानंतर अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांनी २००८च्या पहिल्या आयपीएल हंगामाचे विजेतेपद शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली जिंकले होते.
तत्पूर्वी बेंगलोर विरुद्धच्या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाला योग्य ठरवत आणि नवीन चेंडू उसळी घेणाऱ्या खेळपट्टीचा फायदा घेत प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मॅकॉय आणि ट्रेंट बोल्ट यांनी फलंदाजांना फार काळ खेळपट्टीवर तग धरू दिला नाही. विराट कोहली, कर्णधार फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर हे स्वस्तात बाद झाले.
या सामन्यात बेंगलोरकडून रजत पाटीदारने अर्धशतकी खेळी केली. त्याच्या जोरावर त्यांनी राजस्थानला १५८ धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठीलाग करताना त्यांचा सलामीवीर जोस बटलरने नाबाद शतकी खेळी केली. त्याने ६० चेंडूत नाबाद १०६ धावा करत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. हा सामना राजस्थान संघाने ११ चेंडू शिल्लक राखत ७ विकेट्सने जिंकत बेंगलोरच्या अंतिम सामन्यात खेळण्याच्या आशेवर पाणी फेरले.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘नेक्स्ट विराट’ मानला गेलेल्या उन्मुक्त चंदचं नक्की चुकलं काय? वाचा त्याच्या प्रवासाबद्दल
IPL Final । ‘उद्या रॉयल संघच जिंकेल फायनल’, राजस्थानच्या गोटातील दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
बटलरने विलियम्सनला मागे टाकलेच, पण आता वॉर्नरचा ६ वर्ष जुना ‘हा’ विक्रमही धोक्यात