यंदाचा हंगाम राजस्थान रॉयल्ससाठी फारसा चांगला ठरत नाही आहे. आत्तापर्यंत झालेल्या ५ सामन्यात त्यांना केवळ २ विजय मिळवता आले आहेत तर ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये ते सहाव्या क्रमांकावर आहेत.
यातच आता काही खेळाडूंनी माघार घेतल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आत्तापर्यंत विविध कारणांनी त्यांच्या चार खेळाडूंनी यंदाच्या आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे. हे चारही खेळाडू परदेशी आहेत. आता या खेळाडूंना पर्याय म्हणून राजस्थान इतर संघातील खेळाडूंना लोनवर घेण्याचा पर्याय आजमावण्याची शक्यता आहे.
राजस्थानकडे फक्त ४ विदेशी खेळाडू उपलब्ध
यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच राजस्थानचा मुख्य गोलंदाज जोफ्रा आर्चरने दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यानंतर अष्टपैलू बेन स्टोक्सला पंजाबविरूद्धच्या सामन्यात दुखापत झाल्याने संपूर्ण हंगामाला मुकावे लागले. त्यानंतर लिआम लिव्हिंगस्टोन आणि अँड्रयू टाय यांनी देखील हंगामातून माघार घेतली. बायो बबलचे नियम आणि कोरोनाची भिती यामुळे त्यांनी माघार घेतली. मात्र आता त्यामुळे राजस्थानकडे केवळ डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, जोस बटलर आणि मुस्तफिझुर रहमान या चारच परदेशी खेळाडूंचा पर्याय उपलब्ध आहे.
अशा परिस्थितीत बीसीसीआयने आयपीएलसाठी उपलब्ध करून दिलेल्या लोन पर्यायाचा अवलंब राजस्थानचा संघ करण्याची शक्यता आहे. याबाबत एका सूत्राने माहिती देतांना सांगितले की, “राजस्थानचा संघ खेळाडूंना लोनवर घेण्याचा विचार करतो आहे. याबाबत इतर संघांना देखील विचारणा करण्यात आली आहे. मात्र अजून काहीही नक्की झालेले नाही.”
काय आहे लोनचा नियम?
आयपीएल मधील लोनची सुविधा सोमवारपासून सुरू झाली असून हंगाम संपेपर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल. या नियमानुसार दोनपेक्षा कमी सामने खेळलेल्या खेळाडूंना लोनवर दिल्या जाऊ शकते. मात्र आपल्या मूळ संघाविरुद्धच्या सामन्यात त्याला खेळण्याची परवानगी नाही. या नियमानुसार भारतीय तसेच परदेशी खेळाडूंचीही देवाणघेवाण होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या:
खेळाडूंच्या माघारीने आयपीएलचे आयोजन धोक्यात? बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण
भारतीय ड्रेसिंग रूममध्ये या नावाने जडेजाला मारली जाते हाक, खुद्द शास्त्री गुरूजींनी केला उलगडा
आरसीबीविरूद्ध फलंदाजीला धोनीच्या आधी का आला जडेजा? खुद्द कर्णधारानेच केला उलगडा