---Advertisement---

“अरे किती हसवशील भाऊ”, राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या सॅमसनच्या त्या फोटोंवर चाहत्यांच्या मजेदार प्रतिक्रिया

On: शनिवार, डिसेंबर 5, 2020 10:15 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (4 डिसेंबर) कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात काही युवा खेळाडूंना भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले होते. यात आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा युवा प्रतिभावान फलंदाज संजू सॅमसन याचाही समावेश होता.

सॅमसनने या सामन्यात 15 चेंडूत 23 धावांची धडाकेबाज खेळी केली. एवढेच नव्हे, तर त्याने क्षेत्ररक्षणातही उत्तम कामगीरी केली. राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून संजू सॅमसनचे एक फोटो शेअर करण्यात आले आहे. ज्यामध्ये तो आनंद साजरा करताना दिसत आहे.

आयपीएल 2020 मध्ये संजू सॅमसन ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळला. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात त्याने स्टीव्ह स्मिथचा अवघड झेल टिपला.

राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर अकाउंटवरून सॅमसनचे काही फोटो शेअर करण्यात आले आहे. यात लिहिले आहे की, “आम्ही जे पाहत आहोत ते तुम्ही पाहिलत का?”

“हसमुख संजू सॅमसन”असेही त्यांनी पुढे लिहिले आहे.

 

मात्र, या पोस्टवर चाहत्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होतं आहेत.

https://twitter.com/Prakashkoli218/status/1334837951398744064?s=19

https://twitter.com/HIMANSH46829861/status/1334843794831753221?s=19

https://twitter.com/suchou4/status/1334837826429493248

https://twitter.com/NagdaSab/status/1335054753361874944

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 161 धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 बाद 150 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना 11 धावांनी जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या –

…अन् अशी सुरु झाली शिखर धवनची लव्हस्टोरी

“जर नटराजनने बुमराहसारखीच कामगीरी केली, तर…”, सेहवागने दोघांबद्दल सांगितला अजब योगायोग

“सब्स्टिट्यूट खेळाडू त्याच प्रकारचा असावा”, चहलच्या खेळण्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर उपस्थित केला प्रश्न

ट्रेंडिंग लेख-

मराठीत माहिती- क्रिकेटर शिखर धवन

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी

…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---