राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान आयपीएल 2023 च 11वा सामना खेळला गेला. गुवाहाटीच्या क्रिकेट मैदानावरील या सामन्यात राजस्थानने दिल्लीसमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीला पहिल्या षटकात दोन हादरे बसले. ट्रेंट बोल्टने ही कामगिरी करून दाखवली. त्याचबरोबर त्याने एक विक्रमही आपल्या नावे केला.
राजस्थान साठी दोन्ही सलामीवीर यशस्वी जयस्वाल व जोस बटलर यांनी शानदार खेळ दाखवला. त्यानंतर शिमरन हेटमायर याने नाबाद आक्रमक खेळी करत राजस्थानला 199 पर्यंत मजल मारून दिली. या धावांचा बचाव करताना राजस्थानसाठी पहिले षटक अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट घेऊन आला. त्याने दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ आणि पुढील चेंडूवर मनीष पांडे याला बाद करत राजस्थानला स्वप्नवत सुरुवात दिली. त्यानंतर त्याने आपल्या अखेरच्या षटकातही एक बळी मिळवत 4 षटकात एका निर्धाव षटकासह 29 धावा देत 3 बळी आपल्या नावे केले.
आयपीएलमध्ये 2019 पासून पहिल्या षटकात बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बोल्ट निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स, 2020 ते 2021 पर्यंत मुंबई इंडियन्स व त्यानंतर पुढील दोन वर्ष राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना पहिल्या षटकात तब्बल 19 बळी टिपले आहेत. याबाबतीत त्याच्या जवळपासही कोणता गोलंदाज नाही.
या यादीमध्ये दीपक चहर 8 बळींसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर मुकेश चौधरी व जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी पाच बळी पहिल्या षटकात टिपले आहेत. तर भुवनेश्वर कुमार याने यादरम्यान चार बळी पहिल्या षटकात घेतलेले. आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा पहिल्या षटकात बळी टिपण्याचा मान भुवनेश्वर कुमार याच्याकडे जातो. त्याने 20 वेळा ही कामगिरी करून दाखवलीये. मात्र, लवकरच बोल्ट त्याचा हा विक्रम आपल्या नावे करू शकतो.
(Rajasthan Royals Trent Boult Took 19 Wickets In First Over Since IPL 2019)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई वि. चेन्नई : धोनीने पहिली बाजी जिंकली, नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन
रत्नागिरी अरावली ॲरोज संघाने रोखला परभणी संघाचा विजयीरथ