इंडियन प्रीमियर लीग २०२२चा विसावा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात होणार आहे. विजयरथावर स्वार असलेले हे दोन्ही संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमने सामने येतील. हा सामना जिंकत लखनऊचा संघ त्यांचा विजयरथ कायम ठेवेल. तर राजस्थानचा संघ मागील सामन्यातील पराभवानंतर पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
खेळपट्टी आणि हवामान
राजस्थान विरुद्ध लखनऊ (RR vs LSG) संघातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium, Mumbai) खेळवला जाणार आहे. वानखेडेचे मैदान नेहमीच फलंदाजीसाठी अनुकूल राहिले आहे. मैदानातील सीमारेषा जास्त दूर अंतरावर नसल्यामुळे फलंदाजांचे काम सोपे होते. मात्र हा सामना संध्याकाळी होणार असल्यामुळे मैदानावर दव असतील. अशात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याला प्राधान्य देईल.
आयपीएल २०२२ हंगामातील राजस्थान विरुद्ध लखनऊ सामन्याबद्दल (RR vs LSG Match Preview) जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध लखनऊ सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध लखनऊ सामना १० एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध लखनऊ सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध लखनऊ सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध लखनऊ सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध लखनऊ सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध लखनऊ सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध लखनऊ सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध लखनऊ सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध लखनऊ सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
दोन्ही संघांच्या संभावित प्लेइंग इलेव्हन
या सामन्यासाठी राजस्थानचा संघ त्यांच्या विजयी कॉम्बिनेशनमध्ये बदल न करण्याला प्राधान्य देईल. मात्र मागील काही सामन्यांमध्ये आपली छाप न पाडू शकणाऱ्या रियान परागच्या जेम्स नीशमला संधी दिली जाऊ शकते. तसेच लखनऊ संघातही केवळ एक बदल दिसू शकतो. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मॅच विनिंग अर्धशतकी खेळी करणारा लुईस इतर सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे त्याच्याजागी मार्कस स्टॉयनिसला संधी दिली जाऊ शकते.
राजस्थान रॉयल्स (संभावित संघ)
जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग/जेम्स नीशम, रविचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल.
लखनऊ सुपरजायंट्स (संभावित संघ)
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस/मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022| कोलकाता वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल कोलकाता वि. दिल्ली सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
इकडं धोनी ३६० डिग्री फिरला, अन् तिकडं चाहत्यानं पकडलं डोकं; व्हिडिओ जोरदार व्हायरल