भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजे बीसीसीआयने शनिवारी (10 जानेवारी) मोठी घोषणा केली. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ शनिवारी सकाळी घोषित केला गेला. यात संघात विराट कोहली याचे नाव नसल्याने चाहते नाराज दिसत आहेत. दुसरीकडे रजत पाटीदार आणि मुकेश कुमार यांना पुन्हा संघात घेतल्यामुलेही चाहत्यांमध्ये नाराजीच पाहायला मिळत आहे.
भारतीय संघाने आपला शेवटचा सामना विशाखापट्टणममध्ये खेळला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील हा दुसरा सामना होता, जो भारताने 106 धावांनी जिंकल. रजत पाटीदार () याच्यासाठी हा कसोटी पदार्पणाचा सामना होता. पण कसोटी कारकिर्दीतील पहिल्या सामन्यात 32 आणि 9 धावांची खेळी करून बाद झाला. दुसरीकडे मुकेश कुमार याने विशाखापट्टणममध्ये कारकिर्दीतील तिसरा कसोटी सामना खेळला. मुकेसने या सामन्यातील दोन डावांमध्ये मिळून अवघी एक विकेट घेतली. पहिल्या डावात त्याने 6.23 च्या इकॉनॉमी रेटने 44, तर दुसऱ्या डावात 5.20च्या इकॉनॉमी रेटने 26 धावा खर्च केल्या.
पाटीदार आणि मुकेश मागच्या कसोटीत सुमार प्रदर्शन करताना दिसले. पण तरीही त्यांना इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघात निवडण्यात आले आहे. चाहते आणि जाणकार संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. असे असले तरी, या दोघांनी आगामी सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, याची शक्यता फारच कमी दिसत आहे.
दुसरीकडे विराट कोहली मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांपाठोपाठ शेवटच्या तीन सामन्यांमधूनही बाहेर पडला. वैयक्तिक कारण देत विराटने हा निर्णय घेतला असून बीसीसीआयने त्याच्या निर्णयाचा समर्थन देखील दिले आहे. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळले नव्हते. आता शेवटच्या तीन कसोटींसाठी मात्र त्यांना निवडण्यात आले आहे. विशाखापट्टणम कसोटीत श्रेयस अय्यर याला दुखापत झाली होती. याच कारणास्तव अय्यर इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटींमध्ये उपलब्ध नाहीये.
इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, रविंद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने झाले आहेत. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ आणि इंग्लंड संघ यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळेल. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोट येथे सुरु होईल. त्यानंतर रांचीमध्ये 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत चौथा कसोटी सामना होईल. तर पाचवा आणि अंतिम कसोटी सामना धरमशाला येथील मैदानावर 07 मार्च रोजी सुरु होईल. (Rajat Patidar and Mukesh Kumar have been picked in the squad for the last three Tests against England despite poor performances.)
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन टेस्टमध्ये चमकलेल्या खेळाडूला डच्चू, ‘त्याला संघाबाहेर का काढलं बरं?’ चाहते विचारतायेत प्रश्न
मोठी बातमी! इंग्लंडविरुद्ध एकही टेस्टमध्ये विराट खेळणार नाही, खरं कारण बीसीसीआयनेच सांगितलं, वाचा